वाढत्या उष्णतेच्या बोर्डीतील चिकू बागायतदारांना ‘कडक’ झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 04:17 AM2019-04-02T04:17:56+5:302019-04-02T04:18:08+5:30

मोसमी फळांची आवक वाढली : उत्तर भारतातील मागणी घटल्याने दर गडगडले, पहिल्या प्रतीचा भाव १५, दुसरी ८ रु पये किलो

Growing heat bureaucratic chicken breeders 'hard' | वाढत्या उष्णतेच्या बोर्डीतील चिकू बागायतदारांना ‘कडक’ झळा

वाढत्या उष्णतेच्या बोर्डीतील चिकू बागायतदारांना ‘कडक’ झळा

googlenewsNext

अनिरु द्ध पाटील

बोर्डी : मार्चच्या मध्यापासून वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढल्याने उत्तर भारतातून चिकू फळाच्या मागणीत कमालीची घट झाल्याने चिकूचे दर गडगडले आहेत. शिवाय बाजारात मौसमी फळांची आवक वाढल्याचा परिणामही जाणवू लागला आहे. दरम्यान या हंगामात चिकू उत्पादनात वाढ झाली असून भाव घटल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे.

मागील दोन वर्षांपासून चिकूच्या उत्पादनात सातत्याने चढ-उतार होत असून उत्पादन वाढ आणि दरात घट होत आहे. या वर्षाच्या प्रारंभापासून उत्पादनात वाढ झाली आहे. मात्र मार्चच्या मध्यापासून उष्णतेत वाढ झाल्याने उत्तर भारतातील दिल्ली, आगरा, पंजाब, इंदोर, गुजरात या भागातून असलेली मागणी घटली आहे. चिकू हे फळ उष्ण असल्याने दरवर्षी प्रमाणे यावेळीही मार्च ते जूनमध्ये या काळात मागणी घटून आणि दर पडतात असे उत्पादकांचे म्हणणे आहे. शिवाय या काळात मौसमी फळांची आवक वाढत असल्याने ग्राहकांकडून त्यांना पसंती दिली जाते.
दरम्यान या मौसमात चिकूच्या उत्पादनात वाढ होत असते शिवाय फळांचा आकार आणि रंगही दर्जेदार असतो. परंतु या घडीला प्रतवारीनुसार पहिल्या क्र मांकाला प्रती किलो १५ रुपये, दुसऱ्या क्रमांकाला ८ रु पये आणि सर्वात शेवटचा (गोटीमाल) २ रु पये या कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. तर फळ तोडणीकरिता मजुरी प्रतिकिलोला ४ रु पये, वाहतूक खर्च १ रु पया आणि अन्य खर्च १ रुपया होत असून खर्चाचे गणित जमविणे कठीण होत असल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे या फळाला घोलवड चिकू या नावाने भौगोलिक मानांकन मिळाले असताना लवकरच हमीभावही मिळावा अशी मागणी केली जात आहे.

फळांच्या सर्व दर्जाची एकूण सरासरी काढल्यास चिकूचा भाव ७ ते १० रूपये पर्यंत आहे. चिकू तोडणी, वाहतूक खर्च व ईतर पॅकिंग खर्च मिळून साधारणत: ६ रु पये प्रती किलो खर्च येतो. हे सर्व वजा करता जेमतेम ३ ते ४ रूपये हाती शिल्लक राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांना उदर निर्वाह करणे कठीण झाले आहे. व त्या मुळे शेतकरी चिकूला हमी भाव मिळावा अशी सरकारकडे मागणी आहे
- देवेंद्र राऊत, चिकू बागायतदार नरपड

तालुक्यात चिकू लागवडीचे नोंदणीकृत क्षेत्र ७४२७.३८ हेक्टर असून अद्याप मोठ्या क्षेत्राची बागायतदारांकडून नोंदणी झालेली नाही. त्यामुळे या फलोत्पादनावर अवलंबित्वाचे प्रमाण अधिक आहे. युवा उच्चशिक्षित या क्षेत्राकडे वळले आहेत. तर तोडणी मजूरांसह पूरक व्यवसाय करणाऱ्यांच्या संसाराचा आर्थिक डोलारा या पिकाच्या आधाराने उभा राहू शकला आहे. तालुक्यातील स्थलांतर रोखण्यात चिकू बागांचा मोठा वाटा आहे.
 

Web Title: Growing heat bureaucratic chicken breeders 'hard'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.