अग्निशमने ७ वर्षांत विझविल्या ७५८ आगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 04:39 AM2019-01-09T04:39:44+5:302019-01-09T04:39:59+5:30

ओपन स्पेस न सोडल्याने शमविणे अवघड : मिळेल त्या जागेत ज्वालाग्रही माल, रसायने साठविणे भोवते

Firefighters will get 758 split in 7 years | अग्निशमने ७ वर्षांत विझविल्या ७५८ आगी

अग्निशमने ७ वर्षांत विझविल्या ७५८ आगी

Next

पंकज राऊत

बोईसर : महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या (एमआयडीसी) तारापूर अग्निशमन दलाने मागील सात वर्षात औद्योगिक क्षेत्रासह संपूर्ण परिसरातील मोठ्या (भीषण), मध्यम व छोट्या (मायनर) स्वरूपाच्या अशा ७५८ आगी विझविल्या आहेत. हे दल तारापूर औद्योगिक क्षेत्र व परिसरातील सुमारे तीस ते चाळीस किलोमीटरच्या परीघातील आग विझविण्यासाठी धावून जात असते. यामध्ये मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातामुळे पेट्रोल, गॅस व इतर मालवाहतूक तसेच प्रवासी बससेवा लागलेल्या भीषण आगींचा समावेश असून या आगी जीव धोक्यात घालून विझविण्यात आल्या आहेत.

मागील सात वर्षात सुमारे ७५८ आगी लागल्या त्यामध्ये भीषण स्वरूपाच्या ६० आगीचा समावेश होता, यापैकी काही भीषण स्फोटाच्या घटना घडल्यानंतर आगी लागल्या होत्या. या मधील काही आगींचे स्वरूप तर भयावह होते. काही आगी नियंत्रणात आणण्याकरिता दहा ते पंधरा तास झुंजावे लागले तर आग नियंत्रणात आणल्यानंतर ही चार ते पाच दिवस घटनास्थळी दक्ष राहून कुलिंग व पुन्हा आगीची घटना घडू नये म्हणून तत्पर राहावे लागत होते निष्काळजी व हलगर्जीपणा, मानवी चूका तसेच यंत्रसामग्रीतील दोष व देखभाल व दुरु स्तीकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष इत्यादी कारणांमुळे या घटना घडत असतात. जिगरबाज अधिकारी व जवान हे प्राणपणाला लावून आगीवर नियंत्रण मिळवत असतांना काही वेळा जखमीही झाले होते.

फायरअ‍ॅक्ट व एमआयडीसीचे नियम धुडकाविल्याने तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने जी मार्जिन स्पेस ठेवायला पाहिजे, ती ठेवली जात नसल्याने तसेच तीच्या चारही बाजूने पत्र्याची किंवा प्लॅस्टिकची शेड बांधून तेथे ज्वलनशील कच्च्या व पक्क्या मालाचे रसायनांनी भरलेले ड्रम ठेवण्यात येतात. त्यामुळे आग नियंत्रणात आणतांना खूप अडचणी निर्माण होतात. अनेकदा आग व स्फोटाच्या घटनेमध्ये तेथे काम करणारे मृत तर काही गंभीर जखमी झाले आहेत.

मागील वर्षीच्या ८ मार्चला नोवाफेना या रासायनिक कारखान्यातील भीषण स्फोट व त्या नंतर लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी झुंज देतांना एकीकडे आग दुसरीकडे थोडया थोड्या वेळाने होणारे अनेक स्फोट तिसरी कडे उंच उडालेल्या पिंपातिल पेटत्या रसायनांचे लोळ त्या बरोबरच ती पेटती पिंप कधी आपल्या दिशेने येऊन अंगावर किंवा बंबावर पडतील याचा नेम नाही अशा भीषण परिस्थितीत या दलाच्या जवांनानी ही आग यशस्वीरित्या विझवीली होती, असे असले तरी या परीसरात सुसज्ज असे अग्निशमन दल तातडीने उभारण्याची गरज आहे. कारण वसई विरार, ठाणे कल्याण भिवंडी येथील अग्निशमन दल येण्यास बराच विलंब लागतो, त्यात जिवीत आणि वित्तहानीही होते.

उद्योगांना भरपाई, मृत वा जखमी कामगारांच्या कुटुंबाचे काय?
च्आग विझविण्या करीता आता पर्यत लाखो लीटर पाणी व फोम चा वापर करण्यात आला या मधे उद्योगांचे करोडो रूपयांचे नुकसान झाले अनेक निष्पाप कामगारांचे बळी गेले काही कायमचे अपंग झाले.

च्उद्योगांचे आर्थिक नुकसान विम्याद्वारे भरून निघते परंतु मृत कामगारांच्या कुटुंबाला मिळणारी रक्कम ही तुटपूंजी असते त्यामुळे त्याच्या कुटुंबाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. म्हणूनच स्फोट व आगीच्या घटना घडू नयेत. या करीता सर्वोतोपरी काळजी घेणे गरजेचे आहे

२०१२ ते १८ या सात वर्षातील घटना

२०१२ १२७
२०१३ १११
२०१४ ११६
२०१५ ११०
२०१६ १००
२०१७ ८७
२०१८ १०७

758
एकूण


 

Web Title: Firefighters will get 758 split in 7 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.