अंगावर फांदी पडल्याने अग्निशमन जवानाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 05:38 AM2018-12-08T05:38:00+5:302018-12-08T05:38:06+5:30

वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलातील जवानाचा अंगावर झाडाची फांदी पडून मृत्यू झाला आहे.

Fire brigade death due to limb | अंगावर फांदी पडल्याने अग्निशमन जवानाचा मृत्यू

अंगावर फांदी पडल्याने अग्निशमन जवानाचा मृत्यू

Next

वसई : वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलातील जवानाचा अंगावर झाडाची फांदी पडून मृत्यू झाला आहे. गुरूवारी विरारच्या जीवदानी पाड्यात ही दुर्घटना घडली. बिपिन म्हात्रे (३९) असे या जवानाचे नाव आहे.
ते पालिकेच्या अग्निशमन विभागात वाहन चालक पदावर कार्यरत होते. गुरूवारी दुपारी ड्युटी संपवून ते मित्राला भेटण्यासाठी जीवदानी पाडा येथे गेले होते. तेथे चिंचेचे झाड कापण्याचे काम सुरू होते. तेथे गेले असताना अचानक एक मोठी फांदी त्यांच्या अंगावर कोसळली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, आठ आणि तीन वर्षांची मुले असा परिवार आहे

Web Title: Fire brigade death due to limb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.