पाऊस लांबल्याने बोईसरात पाणीबाणी, भूजल पातळीही खालावली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 12:31 AM2019-06-25T00:31:57+5:302019-06-25T00:32:18+5:30

ग्रामपंचायतीकडून अपुरा पाणी पुरवठा एकीकडे होत असतांना दुसरीकडे पाऊस न पडल्याने भूजल पातळीही खालावली. त्यामुळे या शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

Due to the delay of rain, water level in Boiser and water level decreased | पाऊस लांबल्याने बोईसरात पाणीबाणी, भूजल पातळीही खालावली

पाऊस लांबल्याने बोईसरात पाणीबाणी, भूजल पातळीही खालावली

Next

- पंकज राऊत
बोईसर  -  ग्रामपंचायतीकडून अपुरा पाणी पुरवठा एकीकडे होत असतांना दुसरीकडे पाऊस न पडल्याने भूजल पातळीही खालावली. त्यामुळे या शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जून संपत आला तरी बोईसरच्या काही भागातील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. टँकरच्या दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांसह रोगराई पसरण्याची शक्यता असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाल्याने एमआयडीसीकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्याचा कोटा वाढविण्याची मागणी होत आहे.

साईबाबा नगरपासून केशवनगर ते ओसवाल व्हॅलीपर्यंतच्या भागातील बहुसंख्य इमारतीमध्ये पाणी टंचाईची झळ व तीव्रता मार्च महिन्यापासूनच जाणवत होती. ती आजतागायत आहे अनेक ठिकाणी भूगर्भातील पाणीसाठा संपून कुपनलिकाही कोरड्या पडल्याने नागरिकांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

अनेक इमारतीतील कूपनलिका कोरड्या पडल्यावर त्या ठिकाणी नव्याने तीनशे फुटापर्यंत खोल कूपनलिका खणूनही थेंबभरही पाणी लागत नसल्याने खर्चही वाया गेला तर काही इमारतीमध्ये तर दोन तीन वेळा कूपनलिका खणण्यात येऊनही पाणी न लागल्याने त्यांच्या पदरी निराशाच आली आहे.
एका बाजूला ग्रामपंचायतीकडून होणारा अपुरा पाणी पुरवठा तर दुसºया बाजूला कूपनलिका कोरड्या अशा दुहेरी संकटात बोईसरचे नागरिक सापडल्याने नाईलाजास्तव टँकरचे दूषित पाणी विकत घेऊन वापरावे लागते. त्याकरिता अतिरिक्त खर्च सहन करावा लागतो आहे. काही नागरिकांना महागड्या २० लीटर जारच्या पाण्यावर तहान भागवावी लागते.

तारापूर औद्योगिक वसाहतीमुळे बोईसरच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने दिवसेंदिवस पाण्याची भीषण समस्या जाणवत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार बोईसरची लोकसंख्या ५६ हजार ४९१ असली तरी खरी लोकसंख्या सध्या सुमारे दीड लाखांच्यावर गेली आहे. पाणी टंचाईची तीव्रता कमी व्हावी याकरीता बोईसर ग्रामपंचायतीने विविध नागरी वसाहतीमध्ये मागील वर्षी १८ व या वर्षी १८ कूपनलिका नव्याने खणल्या. परंतु त्यापैकी काही अजूनही कोरड्या आहेत. तर १० किलो एचडीपी पाईप लाईन मधूर हॉटेलजवळून बिग बाजारमार्गे एस.टी.बस स्टँडपासून सहा इंचाची नवीन पाण्याची एक्स्ट्रा लाईन टाकण्यात आली असून या लाईनवर कुणालाही नवीन कनेक्शन दिले जात नसल्याने भंडारवाडा टाकीमध्ये पुरेशा दाबाने वेळेवर पाणी साठवणूक करून त्या पाण्याचा इतर भागात पुरेशा दाबाने पुरवठा करणे शक्य होईल. परंतु त्या करीता एमआयडीसीकडून पुरवल्या जाणाºया पाण्याचा कोटा वाढवून घेणे गरजेचे आहे .

राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार एमआयडीसीने ४० टक्के पाणी कपात सुरु केल्याने त्यामध्ये अधिक भर पडली आहे तर, मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी वापराचा दंडनीय आकार व विलंब शुल्कामुळे ग्रामपंचायतीच्या पाणी बिलाच्या थकबाकीची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. हे वास्तव असले तरी भविष्य काळातील पाणी टंचाई टाळायची असेल तर बोईसरमधील प्रत्येक इमारतीमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग आतापासूनच युद्ध पातळीवर करणे गरजेचे आहे.

नागरिकांना पाणी टचाईमुळे टँकरच्या पाण्यावर रहावे लागते अवलंबून
टँकरच्या दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारासह रोगराई पसरण्याची शक्यता
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
एमआयडीसीकडून पाणी पुरवठा वाढविण्याची गरज

अजून पाऊस दमदारपणे सुरु न झाल्याने भूजल पातळीत सुधारणा झाली नाही. नागरिकांना प्यायचे पाणी जास्तीत जास्त कसे मिळेल याकरिता आम्ही नियोजन करून पाणी पुरवठा करतो. त्याचप्रमाणे आम्ही ग्रामपंचयतीकडून पैसे आकारुन मागणीप्रमाणे टँकरद्वारे पाणी पुरवठा करतो.
- वैशाली बाबर,
सरपंच,
बोईसर ग्रामपंचायत

Web Title: Due to the delay of rain, water level in Boiser and water level decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.