छापा टाकणाऱ्यांचे ‘तिकडे’ दुर्लक्ष का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 12:41 AM2019-04-20T00:41:58+5:302019-04-20T00:42:03+5:30

महाराष्ट्र गुजराज राज्याच्या सीमेवर असलेल्या महामार्गावरील रिसॉर्ट व फार्महाऊसमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यावरील कारवाईमुळे हा भाग चर्चेत आला

Do you ignore those who are involved in raids? | छापा टाकणाऱ्यांचे ‘तिकडे’ दुर्लक्ष का?

छापा टाकणाऱ्यांचे ‘तिकडे’ दुर्लक्ष का?

Next

- सुरेश काटे
तलासरी : महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या महामार्गावरील रिसॉर्ट व फार्महाऊसमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यावरील कारवाईमुळे हा भाग चर्चेत आला असून येथील परिसरात सुरु असणाºया वेश्या व्यवसाय, विनापरवाना नृत्य, जुगार, मटका व सट्ट्यावर स्थानिक पोलीस का कारवाई करीत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
रिसॉर्ट मधील अश्लील कृत्य, दापचारी कृषी क्षेत्रातील अमली पदार्थाचा साठा, राज्यस्थान मधून तलासरीत आणले जाणारे स्फोटक पदार्थ त्याचा मनमानी वापर , दापचरी तपासणी नाक्यावर सुरू असलेला शंभर कोटींचा भ्रष्टाचार व गाड्या पास करणाºया टोळ्या, आर. टी. आ. अधिकाऱ्यांनी हाताखाली ठेवलेले गुंड, महामार्गावरील रात्रभर उघडी असणारी हॉटेल, संभा भागात पकडण्यात आलेला बनावट दारू बनविण्याचा कारखाना या मुळे तलासरी तालुका संवेदनशील बनतोय पण या कडे दुर्लक्ष आहे
तलासरी महामार्गावर आच्छाड येथे असलेल्या रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे येथील सर्वच अंधेरनगरी कारभार चव्हाट्यावर आला आहे. तलासरी पोलिसांनी बुधवारी रात्री अकरा वाजता धाड टाकून रिसॉर्ट मध्ये सुरू असलेला अश्लील प्रकाराचा पडदा फाश केला. या वेळी पोलिसांनी मुंबईतील आठ तरु णींची सुटका करुन गुजरात राज्यातील सुरत येथील नऊ ग्राहकांवर गुन्हा दाखल करून अटक केली होती.
दरम्यान, या रिसॉटमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेले कारनाम्याकडे पालिसांचा कानाडोळा का होता, आच्छाड मधील ग्रीन पार्क रिसॉर्ट हा अनेक नावे बदलून सुरू होता. कधी मंत्रा, मँगो अन् आता ग्रीन पार्क रिसॉर्टच्या नावाने ही मायानगरी सुरु होती. येथे स्थानिक ग्राहकांपेक्षा गुजरात राज्यातील ग्राहक मोठ्या प्रमाणात येतात. नेहमी दरवाजे बंद करून चाललेल्या रिसॉर्टमध्ये स्थानिकाना फिरकूनही दिले जात नव्हते. येथे हुक्का पार्लर सुरू असल्याची चर्चा होती. तसेच, या रिसॉर्ट मध्ये तरु णीची रेलचेल दिसत असल्याने येथे सेक्स रॅकेट सुरू असल्याबाबत तक्रारी होत्या.
पोलीस नियमित येथील हॉटेल व रिसॉर्टची तपासणी करतात. तशा नोंदी शासकीय कागदपत्रांमध्ये आहेत. मग, अचानक छापा मारुन कारवाई होते आणि त्या आधी सर्वकाही अलबेल सुुरु असते याचा अर्थ काही अधिकारी भ्रष्ट आहेत व त्यांच्या आशिर्वादाने हा सर्व प्रकार सरु आहे हे स्पष्ट आहे.
>‘त्या’ फार्महाउसमध्ये रेव्हपार्ट्यांची शक्यता
दोन वर्षांपूर्वी तलासरी पोलीस स्टेशनच्याहद्दीत असलेल्या दापचरी दुग्ध प्रकल्पातील एका कृषी क्षेत्रात लाखो रु पयांचे उच्च प्रतीचे अमली पदार्थ पकडले होत. या प्रकल्पातील कृषी क्षेत्रा पैकी काही क्षेत्रावर धनदांडग्यांनी आलिशान फार्महाऊस बांधली आहेत. त्यांचीही तपासणी होणे आवश्यक आहे.
>तलासरी भागातील हॉटेल , रिसॉर्टची नियमित तपासणी करण्यात येऊन गैर आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल. कुठे गैर घडत असल्यास नागरिकांनीही माहिती द्यावी.
- अजय असावे,
पोलीस निरिक्षक, तलासरी पो.स्टे.

Web Title: Do you ignore those who are involved in raids?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.