खड्ड्यात पडून जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 02:45 AM2017-09-04T02:45:59+5:302017-09-04T02:46:08+5:30

वाढवण गावांतील वरोर -वाढवण आणि वाढवण अप्रोच रस्त्याची चाळण होऊन त्यावर भलेमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्याने भर गणेशोत्सवात रमिला जयवंत राऊत वय ५३ या महिलेचा बळी घेतला.

 Death of a woman injured in a ditch | खड्ड्यात पडून जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

खड्ड्यात पडून जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

Next

शौकत शैख 
डहाणू : वाढवण गावांतील वरोर -वाढवण आणि वाढवण अप्रोच रस्त्याची चाळण होऊन त्यावर भलेमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्याने भर गणेशोत्सवात रमिला जयवंत राऊत वय ५३ या महिलेचा बळी घेतला.
वरोर - वाढवण रस्त्यावर मुंडेश्वरी देवालयाच्या पाठीमागे पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यात दुचाकीचा अपघात होऊन त्यात रमिला राऊत यांच्या डोक्याला मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना अत्यव्यस्थ अवस्थेत सुरत येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांचा २९ आॅगस्टला मृत्यू झाला.
वरोर -वाढवण आणि वाढवण अप्रोच रस्ता हे जुने रस्ते असून, या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करीत असतात. शिवाय बोईसर -वाढवण आणि वाणगाव-वाढवण अशा दिवसाला एस.टी. बस च्या ३२ फेºया होत असतात. वाढवण गावांत डायमेकिगचा व्यवसाय घराघरात चालत असल्याने डाय घेण्यासाठी दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मुंबई, कोलकत्ता, मद्रास आणि दुबई येथून मोठ्या प्रमाणात ग्राहक येत असतात मात्र रस्ते उखडून गेल्याने त्याची चाळण होऊन गुडघाभर खोलीचे खड्डे पडले आहेत त्यावरुन चालणे ही मुश्कील झाले असून,रोज अपघात घडत असतात तसेच हा रस्ता दुरु स्त न झाल्यास १५ दिवसात एसटीच्या संपूर्ण फेºया बंद करण्यात येतील असे एस टी कामगार संघटनांनी कळविले आहे. या गावातून दररोज इतर प्रवाशांबरोबर शेकडो कामगार बोईसरच्या एम.आय.डी.सी मध्ये कामासाठी जात असतात. एसटी बंद झाल्यास या सर्व कामगारांना रोजगाराला मुकावे लागणार आहे.
सत्ताधारी नेत्यांनी गावात आपल्याला मत मिळाली नाहीत म्हणून ह्या गावाचा विकासच होऊ द्यायायचा नाही असे ठरविल्याचे दिसते. म्हणून एकाही रस्त्याच्या दुरूस्तीसाठी तरतूद केली जात नाही इतर गावांना मात्र करोडोचा निधी वापरण्यात येतो अशी अवस्था आहे.

Web Title:  Death of a woman injured in a ditch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.