वन जमिनीवरील रस्ता क्रशर मालकाच्या दावणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 03:02 AM2018-04-13T03:02:57+5:302018-04-13T03:02:57+5:30

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील पोळे ग्रामपंचायतीच्या परिसरातील गुरु ब्रदर्स कंपनीच्या क्रशर मालकाची तळी उचलल्याचा प्रकार केला आहे.

Crushers of forest land road | वन जमिनीवरील रस्ता क्रशर मालकाच्या दावणीला

वन जमिनीवरील रस्ता क्रशर मालकाच्या दावणीला

Next

- आरिफ पटेल
मनोर : वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील पोळे ग्रामपंचायतीच्या परिसरातील गुरु ब्रदर्स कंपनीच्या क्रशर मालकाची तळी उचलल्याचा प्रकार केला आहे. वन हद्दीतील झाले तोडून अनधिकृत रस्ता बनविल्या प्रकरणी नुकतीच त्याच्यावर तात्पूरती दंडात्मक कारवाई करुन सोडले होते. मिळालेल्या माहिती नुसार वनखात्याच्या कर्मचाºयांनी वरिष्ठांची दिशाभूल करुन क्र शर असणाºया ठिकाणी मागच्या बाजूला गाव असल्याचा रिपोर्ट केला आहे. वास्तविक तसे नसुन संगनमताने सुरु असलेला भ्रष्टाचार आहे.
पोळे ग्रामपंचायत परिसरातील वनातील झाडे तोडून केलेल्या कच्चा रस्त्यावरुन खडीची ने आण करणाºया आयवा डंपरची ये जा असते. ही क्रशर मशीन मनोर वन क्षेत्रपाल यांच्या हद्दीमध्ये आहे. या डंपरच्या धुमधडाक्यामुळे येथील वनसंपदा नष्ट झाली असून वन खात्याचे अधिकारी विषय सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही दिवसांपूर्वी पकडलेले दोन डंपर चार-पाच दिवसानंतर सहायक उप वन संरक्षक डी. जे. पवार यांनी आपल्या प्राधिकृत अधिकारामध्ये दंडात्मक कारवाई करुन सोडेले होते.
वास्तविक, संरक्षित वनातील संपदा नष्ट करुन अनधिकृत रित्या तयार केलेला रस्ता त्यांनी बंद न केल्याने केलेली कारवाई फार्स ठरला आहे. त्यामुळे आयवा डंपरची ये-जा बिनदिक्कत सुरु आहे. आपल्या रिपोर्टद्वारे वरिष्ठाची दिशाभूल करणाºया वन अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या बाबत उप वन संरक्षक एन. एस. लडकत यांच्याशी संपर्क साधला असता. सदर क्रशर मशीनच्या मागे गाव असल्याने लोकांना येण्या जाण्यासाठी रस्ता ठेवला अशी माहिती मिळाली. दरम्यान, त्या भागामध्ये कोणतेही गाव नसल्याने ही दिशाभूल अथवा क्रशर मालकाची पाठराखण ठरत आहे.
>पोळे गावचे सरपंच काय म्हणतात?
पोळ ग्रामपंचायतीचे सरपंच लक्ष्मण सदू सुतार म्हणाले की, परिसरातील गुरु ब्रदर्स या क्रशर कंपनीकडे जाणारा रस्ता वन जमिनीतून गेला आहे. क्रेशरच्या मागे माळकरी पाडा आहे. मात्र, क्रशरचे डंपर धावतात त्या रस्त्याशी पाड्याचा काही संबध नाही. पाड्यासाठी मनोर-विक्र मगड मुख्य रस्त्यावरून मार्ग आहे. मिळालेल्या माहिती नुसार सहाय्यक उप वन संरक्षक पवार यांनी लडकत साहेबांची दिशाभूल केली आहे. मी प्राधिकृत अधिकारी असल्याना माझ्या अधिकारात मला दंड आकारणी करुन डंपर किंवा कोणतेही वाहन सोडण्याचा अधिकार आहे.
- डी. जे. पवार, सहाय्यक
उप वन संरक्षक

Web Title: Crushers of forest land road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.