चिंतामण वनगा यांच्या पार्थिवावर दुपारी 2 वाजता होणार अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 12:53 PM2018-01-31T12:53:22+5:302018-01-31T13:00:31+5:30

भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांचे पार्थिव तलासरीच्या कवाडा येथील निवासस्थानी आणण्यात आले आहे. 

Chintaman Vanaga passes away | चिंतामण वनगा यांच्या पार्थिवावर दुपारी 2 वाजता होणार अंत्यसंस्कार

चिंतामण वनगा यांच्या पार्थिवावर दुपारी 2 वाजता होणार अंत्यसंस्कार

Next

पालघर (डहाणू) - भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांचे पार्थिव तलासरीच्या कवाडा येथील निवासस्थानी आणण्यात आले आहे.  त्यापूर्वी वनगा यांचे पार्थिव सकाळी 9.30  वाजता तलासरी येथील पक्ष कार्यालय परिसरात 10 मिनिटं ठेवण्यात आले होते. 10 वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव निवासस्थानी ठेवण्यात आले होते. या वेळी त्यांच्या कुटुंबीयांना दुःख आवरणे कठीण बनले होते. या वेळी हजारो आदिवासी बांधव, भाजपासह सर्व पक्षाचे कार्यकर्ते यांनी वनगा यांचे अंत्यदर्शन घेतले. 

पालकमंत्री विष्णू सावरा,  सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, अमित घोडा, मनीषा चौधरी पार्टी सचिव ओमप्रकाश शर्मा आदींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Chintaman Vanaga passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.