बोईसरमध्ये महायुतीची बविआवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 11:55 PM2019-05-27T23:55:28+5:302019-05-27T23:55:32+5:30

बवीआच्या हक्काच्या मतदारसंघात वर्चस्व निर्माण केल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिने बहुजन विकास आघाडीची पीछेहाट झाली असून आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.

In the Boisar, the greatness of the match can be overcome | बोईसरमध्ये महायुतीची बविआवर मात

बोईसरमध्ये महायुतीची बविआवर मात

googlenewsNext

- पंकज राऊत
लोकसभेच्या पालघर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये बोईसर विधानसभा क्षेत्रात शिवसेना-भाजप युतीने २८ हजार १७२ मतांचे मताधिक्य मिळवून बवीआच्या हक्काच्या मतदारसंघात वर्चस्व निर्माण केल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिने बहुजन विकास आघाडीची पीछेहाट झाली असून आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.
लोकसभेच्या पालघर मतदार संघात पालघर, वसई, नालासोपारा, विक्रमगड, डहाणू व बोईसर अशा एकूण सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश असून वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, नालासोपाऱ्याचे आमदार क्षितीज ठाकूर तर बोईसरचे आमदार विलास तरे असे तीन बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत.
या तीन पैकी वसई विधानसभा व्यतिरिक्त नालासोपारा २४ हजार ६७० तर बोईसर मध्ये २८ हजार १७२ इतकी जास्त मते शिवसेना-भाजप महायुतिचे उमेदवार राजेंद्र गावित यांना मिळाल्याने आपल्याच बालेकिल्ल्यात बविआची पीछेहाट झाली मात्र बवीआला पाठिंबा दिलेल्या माकपा, काँग्रेस राष्ट्रवादी व अन्य पक्ष संघटने मुळे डहाणू व विक्र मगड विधानसभा क्षेत्रात कधी न मिळालेले मताधिक्य बवीआला मिळाले ही जमेची बाजू आहे.
बहुजनाचा विकास हाच प्रगतीचा प्रकाश हा उद्देश ठेवून बहुजन विकास आघाडी नेहमी राजकीय व सामाजिक क्षेत्रात मागील अनेक वर्षापासून कार्यरत आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रभावी जिल्हास्तरीय पक्ष म्हणून २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकी पासून बहुजन विकास आघाडी कडे पाहिले जाते बविआची वसई विरार महानगरपालिकेवर प्रथम पासून मजबूत पकड असून बवीआचे आ. विलास तरे बोईसर विधानसभा मतदार संघाच्या २००९ च्या निवडणुकीत १३०७८ तर २०१४ च्या निवडणुकीमध्ये १२८७३ मताधिक्य मिळवून सलग दोन वेळा निवडून आले आहेत.
पालघर लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीत बवीआचे बळीराम जाधव १२३६० मताधिक्य ने निवडून आले होते तेव्हा बोईसर विधानसभा मतदार संघातून त्यांना ५७९१ मताधिक्य मिळाले होते मात्र त्या नंतर लोकसभेच्या २०१४,१८ (पोट निवडणूक) व २०१९ या दोन निवडणुकीत बोईसर विधानसभा मतदार संघातून बवीआला मताधिक्य मिळाले नव्हते. जनमनाचा व सर्वसामान्यांच्या समस्या व अडचणी चा कानोसा घेऊन त्यांच्या ज्वलंत प्रश्नावर विधानसभेत अनेक वेळा आ. तरे यांनी आवाज उठवला परंतु केलेल्या कामाची प्रसिद्धी तसेच प्रसारमाध्यमांचा वापर करून घेण्यात आलेले अपयश त्यामुळे केलेली कामे मतदारा पर्यंत पोहचत नसल्याने बविआची पिछेहाट झाली.
।विलास तरेंना फाजील आत्मविश्वास नडला
आपला मतदारसंघ बविआचा बालेकिल्ला आहे. आपल्याला प्रसार माध्यमांची गरज नाही अशा भ्रमात तरे हे वावरत असतात. माध्यमांशी संवाद साधणे त्यांना कधीच पसंत नसते. माध्यमांना सहकार्य करणे तर त्यांच्या गावीही नसते. आप्पा सारे काही पाहून घेतील आपण काहीही करायची गरज नाही अशाच समजूतीत ते वावरतात. हीच बाब त्यांना लोकसभेला नडली. आता विधानसभेलाही नडण्याची शक्यता आहे, अशी चर्चा आहे.

Web Title: In the Boisar, the greatness of the match can be overcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.