विना ओसी इमारतींवर बडगा, वसई महापालिकेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 02:47 AM2019-01-10T02:47:16+5:302019-01-10T02:47:28+5:30

वसई महापालिकेचा निर्णय : हे तर, चोर सोडून संन्याशाला फाशी - भाजप

Badge, Vasai Municipal Corporation's decision on non-OC buildings | विना ओसी इमारतींवर बडगा, वसई महापालिकेचा निर्णय

विना ओसी इमारतींवर बडगा, वसई महापालिकेचा निर्णय

Next

पारोळ : वसई-विरार महापालिकेने आपले उत्पन्न वाढविण्यासाठी वसई-विरार शहरातील ज्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र नाही त्या इमारतीमधील रहिवाशांना शास्ती आकारण्यास सुरवात केल्याची माहिती नगर रचना विभाग प्रमुख संजय जगताप यांनी नुकतीच दिली, हा सर्व प्रकार केवळ संतापजनक नाही तर बांधकाम व्यावसायिक आणि विकासकांकडून फसवणूक झालेल्या लाखो रहिवाशांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी टीका भाजपाने केली आहे.

या महापालिका क्षेत्रामधील बहुसंख्य सदनिकाधारकांची बांधकाम व्यावसायिक आणि विकासक यांनी अधिकृत बांधकामाच्या नावाखाली फसवणूक केली आहे. भोगवटा पत्र नसताना किंवा पार्ट ओसी (भोगवटा पत्र) घेऊन लोकांना सदनिकांमध्ये राहण्यास भाग पाडले. महापालिकेकडून त्या सदनिकांना अधिकृत घरपट्टी, नळ जोडणी तसेच महावितरणकडून वीज जोडणी सुद्धा मिळवून दिली आणि आता महापालिका अशा रहिवाशांना शास्ती लावत आहेत. ही प्रचंड बाब आहे, चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार असून बांधकाम व्यावसायिक, विकासक, वास्तुरचनाकार (आर्किटेक्ट) आणि महापालिका अधिकऱ्यांना वाचविण्यासाठी सामान्य रहिवाशांचा बळी महापालिका प्रशासन देत आहे, असा आरोप भाजपने केला आहे

बांधकाम परवाना देणे आणि भोगवटा पत्र देणे, या पलीकडे नगर रचना विभागाचे काहीच काम नाही का? एकदा बांधकाम परवा दिला आणि केवळ जोते प्रमाणपत्र दिले कि नगर रचना विभाग किंवा महापालिका अधिकारी त्या बांधकामाकडे ढुंकून ही बघत नाहीत, कितीही तक्रारी केल्या तरी कागदी घोडे नाचवण्यापलीकडे महापालिका प्रशासन काही करत नाही, आणि मग महापालिका अधिकाºयांच्या आशिर्वादाने विकासक मनमानी बांधकाम करून सदनिका धारकांना ते अधिकृत भासवून राहण्यासाठी देत आहेत. इतर महापालिकां प्रमाणे प्रत्येक माळा तसेच प्रत्यके टप्प्यामध्ये त्याची तपासणी होऊन परवान्याप्रमाणे काम होते आहे कि नाही, हे बघण्याची जबाबदारी नगर रचना विभागाची आहे परंतु आपली जबाबदारी नीट पूर्ण न करता सर्वसामान्यांना वेठीस धरणाºया महापालिकेने प्रथम अनधिकृत बांधकामे करणारे बिल्डर, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्यांना सहकार्य करणारे आर्किटेक्ट, महापालिका व नगररचना विभागाचे अभियंता व नगररचना विभागाचे , भोगवटा प्रमाणपत्र नसतांना नियमीत घरपट्टी लावणारे, भोगवटा पत्र नसताना नळ जोडणी देणारे अधिकारी यांच्यावर काय कारवाई करणार आहे तसेच या सर्वांवर गुन्हे कधी दाखल होणार याचा तपशील द्यावा. या सर्वाना पाठीशी घालणारे नगररचना अधिकारी व महापालिका अधिकारी याच्यावर कारवाई कधी होणार?*

चोर सोडून सामान्य करदात्याला छळण्याचा हा प्रकार महापालिकेच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. हिम्मत असेल तर महापालिकेने बिल्डर, आर्किटेक्ट महापालिका अधिकारी यांच्यावर कारवाई करून दाखवी आणि मगच सदनिकाधारकाला बांधकाम नियमित करण्यासाठी दंड ठोठवावा.
-मनोज पाटील, जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा

Web Title: Badge, Vasai Municipal Corporation's decision on non-OC buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.