रिक्त पदांवरून चालतोय नगरपंचायतींचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 03:12 AM2018-08-13T03:12:11+5:302018-08-13T03:12:29+5:30

ग्रामपंचायतीचे विभाजन करुन विक्रमगड ही नविन नगरपंचायत उदयास आली नगरपंचायत झाल्यावर ती मध्ये समाविष्ट झालेल्या पाडयांचा विकास साधला जाईल, अशी मोठी आशा येथील नागरिकांना होती, परंतु ती आता फोल ठरतांना दिसत आहे़.

The administration of the Nagar Panchayats is run by vacant posts | रिक्त पदांवरून चालतोय नगरपंचायतींचा कारभार

रिक्त पदांवरून चालतोय नगरपंचायतींचा कारभार

Next

विक्रमगड : ग्रामपंचायतीचे विभाजन करुन विक्रमगड ही नविन नगरपंचायत उदयास आली नगरपंचायत झाल्यावर ती मध्ये समाविष्ट झालेल्या पाडयांचा विकास साधला जाईल, अशी मोठी आशा येथील नागरिकांना होती, परंतु ती आता फोल ठरतांना दिसत आहे़. कारण नगरपंचायतीच्या निर्मितीपासून गेल्या दोन वर्षामध्ये येथील सर्वच पदे रिक्त आहेत एकही पद शासनाने भरलेले नाही़ त्यामुळे सध्या तरी तीचा कारभार हा रिक्तपदांवरच हाकला जात असल्याने विकास कामांना मोठी खीळ बसली आहे़
विक्रमगड नगरपंचायतीचे कामकाज मुख्याधिकारी डॉ़ धीरज चव्हाण यांच्या नेतृत्वखाली सुरु झाला त्यास दोन वर्षाचा काळ लोटलेला आहे़ मात्र तो नगरपंचायतीकरीता असलेली १५ कर्मचाऱ्यांची पदे न भरताच सुरु करण्यांत आल्याने विकासकामांना गती कशी येणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. या अनुषंगाने नगरपंचायतीतील शासनाने सर्व रिक्त पदे भरा, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे़
नगरपंचायतीचा कारभार सुरु करण्या आधी नागरिकांना सोयी सुविधा पुरविणे. तसेच नगरपंचायतीची मांडणी सुनियोजितपणे करणे व नगर रचना योजना लागू करुन नियोजनबध्द विकासासाठी तज्ज्ञ कर्मचारी नेमणे आवश्यक होते. मात्र त्यांचीच उणिव भासते आहे़ फक्त मुख्याधिकारी हेच पद भरण्यात आलेले आहे़
विक्रमगड नगरपंचायतीमध्ये यशवंतनगर, टोपलेपाडा, नवापाडा, संगमनगर, शिंपीपाडा, पडवळेपाडा, रोहिदासनगर, गभालेपाडा, दिवेकरवाडी, विक्रमगड, वालीपाडा, कातकरीपाडा, वाकडुचापाडा, पाटीलपाडा समाविष्ट आहेत. सर्व मिळून १० हजार लोकसंख्या असलेली व १७ वॉर्ड असलेली नगरपंचायत अस्तित्वात आलेली आहे येथे यापूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रशासकीय कारभार चालविला जात होता. मात्र या काळात गावाचा विकास होणे. जनतेच्या समस्या, त्यांच्या तक्रारी याचे निराकरण होणे त्यांना मिळणा-या मूलभूत सुविधा प्राप्त करून देणे अपेक्षित होते. परंतु या पैकी काहीही झालेले नाही. ग्रामपंचायतीऐवजी नगरपंचायत अस्तित्वात आली हा प्रशासकीय बदल सोडला तर कशातही फरक पडलेला नाही. त्यामुळे या नगरपंचायतीचे करावे तरी काय? असा प्रश्न जनतेला पडला आहे. विविध प्रश्नांची उकल गेल्या अनेक वर्षापासून झालेली नव्हती. तशी ती आता नगरपंचायत झाली तरीही झालेली नाही. मग या परीवर्तनाचा उपयोग काय?

नगरपंचायतीकरिता शासनमान्य मंजूर पदांचा तपशील
नगरपंचायतीची एकंदरीत लोकसंख्या आजच्या घडीला १० हजारापर्यत आहे़ या लोकसंख्येच्या आधारावर नगरपंचायतीमधील गाव पाडयांच्या विकासासाठी मंजूर पदांमध्ये १)सहायक कार्यालय अधिक्षक, २)सहायक मालमत्ता पर्यवेक्षक, ३)सहायक सार्वजनिक बांधकाम अभियंता, ४)सहायक पाणीपुरवठा अभियंता, ५)सहायक नगररचनाकार, ६)सहायक समाजकल्याण व माहिती जनसंपर्क अधिकारी, ७)करनिरिक्षक, ८) लेखापाल, ९)लिपिंक टंकलेखक, १०)गाळणी चालक, वीजतंत्री, जोडारी, ११)पंप आॅपरेटर, वीजतंत्री, जोडारी, १२)शिपाई, १३)मुकादम, १४)व्हॉल्व्हमन, १५)स्वच्छता निरिक्षक़ अशी एकुण मुख्याधिकारी वगळता १५ पदे आहेत. त्यापैकी एकही पदे भरलेले नाही़त्यामुळे आज मितीस या नगरपंचायतीच्या विकासाला खिळ बसलेली आहे़

पदांकरीता आकृतीबंध मंजूर झाल्यावर शासनाकडून ती भरण्यात येतील कारण या पदांची भरती महाराष्टÑशासनाकडे आहे. ती भरण्यासंदर्भात मी पत्रव्यवहार देखील केलेला आहे़
- डॉ़ धीरज चव्हाण,
मुख्याधिकारी नगरपंचायत

शासनाने शहरीभागातील मुख्य ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा दिला खरा मात्र त्यामध्ये असलेली सर्वच पदे रिक्त आहेत़ त्यामुळे नगरपंचायतींना सोयी सुविधा पुरविणे, प्रशासकीय मांडणी करणे, नगररचना लागू करणे, गाव-पाडयांचा विकास करण्याकरीता तज्ज्ञ कर्मचारी आवश्यक आहेत. -रविंद्र खुताडे, नगराध्यक्ष

Web Title: The administration of the Nagar Panchayats is run by vacant posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.