बांधकाम विभागाच्या वसाहतीत पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:06 AM2018-09-15T00:06:13+5:302018-09-15T00:06:41+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसाहतीत मागील तीन दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाºयांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नेहमीच या वसाहतीतील पंपींग स्टेशनमधील पाण्याची मोटर जळत असल्याची ओरड वसाहतीत राहणाºयांकडून होत आहे.

Water Resistance in Construction Area | बांधकाम विभागाच्या वसाहतीत पाण्याचा ठणठणाट

बांधकाम विभागाच्या वसाहतीत पाण्याचा ठणठणाट

Next
ठळक मुद्देशासकीय कर्मचाऱ्यांची पाण्यासाठी भटकंती : देखभाल दुरूस्तीकडे होताहेत दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसाहतीत मागील तीन दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाºयांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नेहमीच या वसाहतीतील पंपींग स्टेशनमधील पाण्याची मोटर जळत असल्याची ओरड वसाहतीत राहणाºयांकडून होत आहे.
शहरातील पोस्ट आॅफीस चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकापर्यतच्या मार्गालगत सार्वजनिक बांधकाम विभागाची वसाहत आहे. या वसाहतीत सर्व विभागातील शासकीय कर्मचारी वास्तव्यास आहे. या इमारतील वास्तव्यापोटी कर्मचाºयांच्या वेतनातून निवास भाडेही कपात केले जाते.परंतू बांधकाम विभागाकडून सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या वसाहतीतील पंपींग स्टेशनमधील पाण्याची मोटर तीन दिवसांपासून जळालेली असल्याने कर्मचाºयांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. यापूर्वीही अनेकदा ही मोटर जळाल्याने येथील नागरिकांना पाणीबाणी सहन करावी लागली. त्यामुळे याबाबत बांधकाम विभागाकडे तक्रार केली असता बांधकाम विभागाच्या विद्यूत विभागाकडे बोट दाखविले जाते. मोटर जळली की तीच दुरुस्त करुन लावली जाते.पण, नवीन मोटर लावून ही समस्या कायम स्वरुपी निकाली काढली जात नाही. निधीची कमतरता असल्याचे कारण पुढे करुन बांधकाम विभाग हात वर करीत आहे. शासकीय कर्मचाºयांच्याच वाटेला हे दुखन असतांना तेथे सर्वसामान्य नागरिकांची काय परिस्थिती होईल, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

गवताने वेढलेल्या कुपननलीकेचा आधार
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसाहतीत पाण्याची समस्या निर्माण झाली तर कुपनलीकाचा आधार व्हावा, म्हणून कुपनलीका बसविण्यात आली.परंतू याकडेही दुर्लक्ष असल्याने कुपनलीकेच्या सभोवताली गवताचा वेढा आहे. येथील स्वच्छतेकडेही दुर्लक्ष होत असल्याने वसाहतीतील महिला, पुरुष व चिमुकल्यांना रात्री अंधारात याच कुपनलीकेवरुन पाणी भरण्याची वेळ आली आहे. यामुळे वसाहतीतील नारिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.

Web Title: Water Resistance in Construction Area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.