नवजीवनच्या थांब्यांची १३ वर्षांची प्रतीक्षा संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 11:21 PM2017-09-01T23:21:11+5:302017-09-01T23:21:27+5:30

एकेकाळी पुलगाव ही कॉटन मील व कापसाची बाजार पेठ होती. पुलगाव-आर्वी ही शकुंतला रेल्वे गाडी, गणेशोत्सव यामुळे पुलगाव शहराला वैभवशाली परंपरा लाभलेली होती.

Waiting for 13 years of waiting for the rest of the journey has ended | नवजीवनच्या थांब्यांची १३ वर्षांची प्रतीक्षा संपली

नवजीवनच्या थांब्यांची १३ वर्षांची प्रतीक्षा संपली

Next
ठळक मुद्देरामदास तडस : विरोध झाला तरी पुलगावचे गेलेले वैभव परत मिळवून देणार

लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : एकेकाळी पुलगाव ही कॉटन मील व कापसाची बाजार पेठ होती. पुलगाव-आर्वी ही शकुंतला रेल्वे गाडी, गणेशोत्सव यामुळे पुलगाव शहराला वैभवशाली परंपरा लाभलेली होती. काँग्रेस शासनाच्या काळात भरभराटीस आलेला एक मोठा वस्त्रोद्योग बंद झाला. केंद्र व राज्यात सध्या भाजपाचे सरकार असून कितीही विरोधी झाला तरी आपण या शहराचे गेलेले वैभव परत मिळवून देऊ, अशी ग्वाही खासदार रामदास तडस यांनी पुलगाव रेल्वे स्थानकावर अमदाबाद-चैन्नई नवजीवन एक्स्प्रेसचे स्वागत करताना दिली.
स्थानिक रेल्वे स्थानक फलाट क्रमांक १ वर भाजपा शहर तर्फे नवजीवन एक्सप्रेसचे स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, माजी खासदार सुरेश वाघमारे, नगराध्यक्ष शितल गाते, वर्धा न.प.चे माजी नगरसेवक कमल कुलधरीया, स्टेशन अधीक्षक सवाई, भाजपा जिल्हा प्रवक्ता राहुल चोपडा, भाजपा शहराध्यक्ष मंगेश झाडे, पे्रमप्रकाश पाटणी, रमेश तिवारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. खा. तडस पुढे म्हणाले, शासनाची मंजूरी नसल्यामुळे थांबलेले रेल्वे उड्डानपुलाचे काम, केंद्रीय दारूगोळा भांडारामुळे अडलेले स्मशानभूमीचे सौदर्यीकरण, पुलगाव- आर्वी-वरूड-आमला या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर, नागपूर-मुंबई या द्रुतगती मार्गाचे चौपदरीकरण आदी प्रश्न लवकर मार्गी लागावे यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. यापैकी अनेक कामासाठी निधीही उपलब्ध झाला आहे. पुलगावकरांची १३ वर्षांपासून असलेली नवजीवन एक्सप्रेसच्या थांब्याची मागणी आज पूर्ण झाली आहे. नागपूर-पुणे गरीब रथ, बिलासपूर-पुणे एक्सप्रेस, आजाद हिंदू एक्स्प्रेस या जलद रेल्वे गाड्यांचा पुलगाव स्थानकावर थांबा मिळविण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून भाजपा कार्यकर्ते, नागरिक, पत्रकार यांच्या सहकार्याशी शिवाय कुठलेही काम शक्य नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नवजीवन एक्सप्रेस येण्यापूर्वी आयोजित कार्यक्रमात शहरातील नगर परिषद, भाजपा व्यापारी, संघटना, जैन युवा मंच, बाबा बर्फानी ग्रुप, वाल्मीकी समाज, बेलदार समाज, मुस्लीम समाज, यांचेसह शहरातील विविध सामाजिक संघटनाद्वारे खा. तडस यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राजेश बकाने, सुरेश वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले. नवजीवन एक्सप्रेसचे चालक एम. कुस्ती व गार्ड राठोड व प्रथम प्रवाशी डॉ. एम. मोहनराव यांचा सपत्नीक खासदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक नितीन बडगे यांनी केले. संचालन आकाश दुबे यांनी केले.

Web Title: Waiting for 13 years of waiting for the rest of the journey has ended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.