बापू कुटी व सेवाग्राम आश्रमला दिली उपराष्ट्रपतींनी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:56 PM2018-02-26T13:56:24+5:302018-02-26T13:56:33+5:30

देशाचे उपराष्ट्रपती एम. व्येंकय्या नायडू यांनी रविवारी सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. रामदास तडस, राज्यसभा सदस्य खा.डॉ. विकास महात्मे, आ.डॉ. पंकज भोयर उपस्थित होते.

The visit of Vice President to Bapu Kuti and Sevagram Ashram | बापू कुटी व सेवाग्राम आश्रमला दिली उपराष्ट्रपतींनी भेट

बापू कुटी व सेवाग्राम आश्रमला दिली उपराष्ट्रपतींनी भेट

googlenewsNext
ठळक मुद्देमनरेगाद्वारे खादीला प्रोत्साहन देण्याची मागणीआश्रमचे मंत्री प्रा.डॉ. श्रीराम जाधव यांनी चरखा आणि विणाईला मनरेगात समाविष्ट केले तर ग्रामीण भागात रोजगाराची संधी निर्माण होईल आणि खादीला प्रोत्साहन मिळेल. यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी मागणी करीत निवेदन दिले. यावर उपराष्ट्रपतींनी सकारात्मक प्रतिसाद देत

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/सेवाग्राम : देशाचे उपराष्ट्रपती एम. व्येंकय्या नायडू यांनी रविवारी सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. रामदास तडस, राज्यसभा सदस्य खा.डॉ. विकास महात्मे, आ.डॉ. पंकज भोयर उपस्थित होते. आश्रमात आगमन होताच प्रथम त्यांनी आदी निवासाला भेट दिली. यानंतर बापू कुटी व आश्रमातील सर्व परिसराची पाहणी केली. यावेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर यांनी सुतमाळ व पुस्तक देऊन उपराष्ट्रपती नायडू यांचे स्वागत केले.
बापू कुटीमध्ये सर्वधर्म प्रार्थना, एकादश व्रत व भजन झाले. यानंतर बापू कुटीसमोर चरखाची माहिती त्यांनी जाणून घेतली. येथे काम करणाऱ्या महिलांशी उपराष्ट्रपतींनी संवाद साधला. महादेव कुटीतील कापूस ते कापड हा आश्रमचा उपक्रम त्यांनी समजावून घेत पाहणी केली.

 

Web Title: The visit of Vice President to Bapu Kuti and Sevagram Ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.