कापूस वेचणीच्या संशोधन अहवालावर कार्यवाही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:43 AM2017-11-10T00:43:53+5:302017-11-10T00:44:16+5:30

भारत हा जागतिक बाजारातील मोठा कापूस उत्पादक देश आहे; पण भारतात अनेक भागांत कापूस वेचणीचे काम महिला मजुरांकडून करून घेतले जाते.

There is no action on the research report of cotton waste | कापूस वेचणीच्या संशोधन अहवालावर कार्यवाही नाही

कापूस वेचणीच्या संशोधन अहवालावर कार्यवाही नाही

Next
ठळक मुद्देमहिला मजुरांना त्रास : यांत्रिकीकरणाकडे सरकारची पाठ

सुधीर खडसे।
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : भारत हा जागतिक बाजारातील मोठा कापूस उत्पादक देश आहे; पण भारतात अनेक भागांत कापूस वेचणीचे काम महिला मजुरांकडून करून घेतले जाते. यामुळे महिला मजुरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन भारतीय कृषी कापूस अनुसंधान संस्थेने आॅक्टोबर २००४ मध्ये अभ्यास करून शासनाकडे निष्कर्ष अहवाल सादर केला होता. यावर कार्यवाही करून कापूस वेचणीच्या कामात यांत्रिकीकरण, महिलांचा त्रास कमी होणाºया बाबी अंमलात आणाव्या, अशा सूचना केल्या होत्या; पण या अहवालावर कोणतीही कार्यवाही अद्याप झाली नाही. यामुळे कापूस मजुरांच्या व्यथा कायमच आहेत.
जगात भारत, पाकिस्तान, आॅस्ट्रेलिया, इस्राईल, अमेरिका या देशांमध्ये ९० टक्के कापसाचे उत्पादन होते. येथे कापूस वेचणीसाठी वापरण्यात येणाºया वेगवेगळ्या पद्धती आहेत. भारतात मात्र महिला मजुरांकडून कापूस वेचून घेतला जातो. पाच बोटांमध्ये कापूस पकडून तो बोंडाबाहेर काढण्याचे काम करण्यात येते. कापूस वेचणीची ही पद्धती अत्यंत त्रासदायक आहे. यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यामध्ये मणक्याचे, कमरेचे आदी अनेक आजार आदी जडतात, असा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे.
आॅक्टोबर २०१४ मध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने कापूस पिकावर जागतिक संशोधन केले. या संशोधनात कापूस वेचणीबाबत काही निष्कर्ष मांडलेत. त्यात भारत, पाकिस्तान आणि चीन या देशांत कापूस वेचणीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर करण्याची टक्केवारी शून्य असल्याचे नमूद केले आहे. कापूस वेचणीसाठी मराठवाड्यातील परभणी येथील कृषी विद्यापीठाने कापडाचा खिसा असलेला कोट वापरण्याची सूचना केली होती. समोरच्या भागात साडेपाच किलो कापूस ठेवता येईल, अशा पद्धतीचा कोट तयार करण्यात आला होता; पण कापूस वेचणाºया महिला स्व-खर्चाने हा कोट खरेदी करीत नाहीत, असे आढळून आले आहे. भारतात कापूस वेचणीचे यंत्र तयार करण्यात आले आहे. हे यंत्र बोंडाजवळ नेल्यावर ५० ते ६० किलो कापूस एका तासात वेचता येतो. एका तासात १०० किलो कापूस वेचणे शक्य आहे; पण आपल्याकडे राज्य सरकारचा कृषी विभाग कापूस वेचणीच्या कामात यांंत्रिकीकरणाचा वापर करून घेण्याबाबत प्रचंड उदासीन आहे. त्यामुळे आजही महिलांना कापूस वेचणीचे काम करावे लागत असल्याची खंत नॅशनल हार्टिकल्चर मिशनचे संचालक चंद्रशेखर पडगिलवार यांनी व्यक्त केली आहे.
यंदा कापूस वेचणी महागली
पूर्वी विदर्भाच्या विविध भागात एक महिला दिवसभर जितका कापूस वेचत होती, त्यानुसार किलोच्या आधारे तिला मजुरी दिली जात होती. यंदा मात्र शेतकºयांना २०० रुपये मजुरीवर महिलांना कापूस वेचणीच्या कामासाठी बोलवावे लागत आहेत. एक महिला साधारणत: २० ते २५ किलो कापूस दिवसभरात वेचते. पूर्वी १३० रुपयांत हे काम होत होते. आता २०० रुपये द्यावे लागत आहेत. म्हणजे ७० रुपये अधिकचे शेतकºयाला मोजावे लागत आहेत. त्यामुळे आता कापूस वेचणीसाठी यांत्रिकीकरणावर भर देणे गरजेचे झाले आहे. विदर्भात कापूस हे सर्वात महत्त्वाचे तथा ते नगदी पीक असल्याने शेतकरी यावरच निर्भर आहे.

कापूस पिकावर संशोधनं होऊन शेतकºयांना शासकीय आधार मिळणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊनच संशोधनं केली जात आहेत; पण त्यावर अंमलबजावणी होत नसल्याचेच दिसून येत आहे. परिणामी, शेतकºयांना आजही वेचणीचा अधिक खर्च करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: There is no action on the research report of cotton waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.