नंदोरी येथे कापूस खरेदी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 11:55 PM2017-10-23T23:55:12+5:302017-10-23T23:55:38+5:30

समुद्रपूर तालुक्यातील नंदोरी येथील चोरडिया इंडस्ट्रीजमध्ये सोमवारी कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.

Start buying cotton in Nandori | नंदोरी येथे कापूस खरेदी सुरू

नंदोरी येथे कापूस खरेदी सुरू

Next
ठळक मुद्दे४१०० रुपये भाव हजार क्विंटलची आवक

लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणपूर : समुद्रपूर तालुक्यातील नंदोरी येथील चोरडिया इंडस्ट्रीजमध्ये सोमवारी कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कृउबास संचालक अतुल वांदिले, महेश पाटील झोटींग, बँक आॅफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापक वैशाली गहूकर, सरपंच डॉ. युवराज तांदूळकर, मनोज पिंपळकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रथम बैलगाडी आणणारे शेतकरी दीवाकर पारखी गोविंदपूर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आज आलेल्या सर्वच शेतकºयांना ४१०० रुपये प्रती क्विंटल भाव देऊन कापूस खरेदी करणार असल्याचे अशोक वांदिले यांनी सांगितले. दिवसभरात या केंद्रावर एक हजार क्विंटल कापसाची आवक झाली.

Web Title: Start buying cotton in Nandori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.