बोरनदी घाटाच्या सौंदर्यीकरणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 11:55 PM2018-12-19T23:55:14+5:302018-12-19T23:55:38+5:30

विदर्भाचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र घोराड येथील मंदिर परिसराला लागून असलेल्या नदी घाटाच्या विकासाला पर्यटन विभागाकडून मिळालेल्या निधीतून बोर नदीपात्राचे सौंदर्यीकरण व घाटाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे.

Start of the beautification of Boronadi Ghat | बोरनदी घाटाच्या सौंदर्यीकरणास प्रारंभ

बोरनदी घाटाच्या सौंदर्यीकरणास प्रारंभ

Next
ठळक मुद्दे२६३ कोटीचा निधी मंजूर : आमदारांनी पर्यटन विभागातून आणला निधी

विजय माहुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : विदर्भाचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र घोराड येथील मंदिर परिसराला लागून असलेल्या नदी घाटाच्या विकासाला पर्यटन विभागाकडून मिळालेल्या निधीतून बोर नदीपात्राचे सौंदर्यीकरण व घाटाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे घोराड येथील नदी घाटाचे रूप पालटणार आहे.
येथील नदी घाटासाठी फेब्रुवारी २०१८ मध्ये शासनाने २६३ लक्ष रूपयाचा निधी मंजूर केला. १० सप्टेंबर ला घाटाचे बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. दोन दिवसापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असल्याने या नदीघाटामुळे व परिसराच्या होणाºया सौंदर्यीकरणामुळे प्रतिपंढरीची शोभा वाढणार आहे.
घोराड येथे अनेक धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल राहत असल्याने विदर्भातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपºयातून असंख्य भाविक येथे येत असतात. अनेक दिवसापासून बोर नदीपात्राची सौंदर्यीकरणाची मागणी होती. मंदिर परिसरालगत तत्कालीन आमदार प्रमोद शेंडे, माजी जि.प. अध्यक्ष विजय जयस्वाल, जि.प. सदस्य राणा रणनवरे यांच्या पुढाकाराने या नदीवर तीन ठिकाणी घाटाच्या पायºया बांधण्यात आल्या. मात्र आमदार पंकज भोयर यांनी गत दोन वर्षाअगोदर या परिसराची पाहणी केली व बोरनदी पात्राचे रूपडे पालटविण्याचे आश्वासन देत २६३ लक्ष रूपयाचा निधी मंजूर करून आणला. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थ आनंदीत आहे. येथील कामात विद्युत रोषणाई, घाटाच्या पायºया, चेजिंग रूम, बगीच्या आदी बाबीचा समावेश आहे.
तीन महिन्यांपासून रखडले होते काम
पोळ्याच्या मुहुर्तावर खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावार यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. मात्र मागील तीन ते चार महिन्यापासून हे काम रखडलेले होते. ‘लोकमत’ ने या कामाबाबत सातत्याने पाठपुरावा केला. या कामाची डिझाईन नागपुर येथून तयार करून बांधकाम विभागाला देण्यात येणार होती. परंतु यासाठी विलंब होत होता. यावरही लोकमतने पाठपुरावा केल्यामुळे अखेरीस या कामाला आता सुरुवात झाली आहे.

Web Title: Start of the beautification of Boronadi Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी