तूर खरेदीच्या आॅनलाईन नोंदणीला विराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:03 AM2018-04-19T00:03:36+5:302018-04-19T00:03:36+5:30

शासकीय तूर खरेदी यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना अडचणीचीच ठरली. यात आतापर्यंत झालेल्या तूर खरेदीचे चुकारे शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाहीत. त्याची प्रतीक्षा असतानाच तूर खरेदीच्या आॅनलाईन नोंदणीला बुधवारी विराम देण्याचे शासन आदेश धडकले.

Pause of online registration of tur purchase | तूर खरेदीच्या आॅनलाईन नोंदणीला विराम

तूर खरेदीच्या आॅनलाईन नोंदणीला विराम

Next
ठळक मुद्देशासनाचे आदेश : शेतकऱ्यांची हमीभावाची आशा मावळली

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासकीय तूर खरेदी यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना अडचणीचीच ठरली. यात आतापर्यंत झालेल्या तूर खरेदीचे चुकारे शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाहीत. त्याची प्रतीक्षा असतानाच तूर खरेदीच्या आॅनलाईन नोंदणीला बुधवारी विराम देण्याचे शासन आदेश धडकले. परिणामी, शासकीय दरात तूर विकण्याची इच्छा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांची आशा मावळली आहे. यातच गोदाम व हमालांच्या समस्येमुळे नोंद झालेली तूर खरेदी होईल वा नाही, याबाबतही साशंकता निर्माण झाली आहे.
अक्षय तृतिया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याचे मानले जाते. या दिवशी अनेकांकडून शुभकार्य होताना दिसते; पण शासनाच्यावतीने या मुहूर्ताला शेतकºयांची तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय घेत तो अशुभ ठरविल्याची चर्चा आहे. शासनाच्या पत्रानुसार बुधवारपर्यंत तुरीची आॅनलाईन नोंदणी करणाºया शेतकऱ्यांकडूनच तूर खरेदीच्या सूचना आहेत. आॅनलाईन नोंदी करणाऱ्या केंद्रांवर गर्दी झाल्याने बºयाच शेतकºयांनी काही काळ प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला; पण आता ही नोंदणी बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने शेतकरी हमी भावापासून वंचित राहणार असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत झालेल्या तूर खरेदीत शेतकºयांचे चुकारे अद्याप अडले आहेत. एकट्या वर्धा जिल्ह्यात नाफेड आणि विदर्भ मार्केटींग फेडरेशनच्यावतीने दहा केंद्रांवरून ८० हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे. या तूर खरेदीपोटी ३५ कोटी रुपयांचे चुकारे थकले आहे. यामुळे शेतकºयांची आर्थिक कोंडी झाली आहे. शेतकºयांकडून नव्या उमेदीने पुन्हा नव्या खरीपाची तयारी सुरू झाली आहे. उन्हाळवाही करीत बी-बियाणे खरेदीकडे तो वळत आहे; पण त्याच्याच उत्पादनाचे चुकारे त्यांना मिळाले नसल्याने त्यांची गोची होत आहे. यामुळे शेतकºयांचे चुकारे तत्काळ देण्याची मागणी होत आहे.
गोदामाची समस्या कायमच
तूर खरेदी झाली त्या काळापासूनच राज्यात गोदामाची समस्या निर्माण झाली होती. सध्या खरेदी झालेली तूर ठेवण्याकरिता जागा नसल्याने खरेदी बंद करण्याचा निर्णय शासनाच्यावतीने घेण्यात आल्याची माहिती आहे. वर्धा जिल्ह्यातील केंद्रांवर खरेदी झालेली तूर बाजार समितीत पडून आहे. यातच पावसाचे संकेत असल्याने ही तूर ओली होण्याची शक्यता आहे.
चुकारे करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाला आग
तूर उत्पादक शेतकऱ्यांचे चुकारे देण्याची जबाबदारी असलेल्या कंपनीच्या कार्यालयाला आग लागली आहे. यामुळे शेतकºयांचे चुकारे अडल्याची माहिती महाराष्ट्र मार्केटींग फेडरेशनच्यावतीने सांगण्यात आले आहे.

शासकीय तूर खरेदीकरिता आॅनलाईन नोंदी करण्याचे शासनाचे आदेश आहेत. ही नोंदणी उद्या बुधवारपासून बंद करण्यात येणार आहे. त्या शेतकऱ्यांनी नोंदी केल्या आहेत त्यांची तूर खरेदी करणार आहे. पण ती ठेवण्याची समस्या समोर असल्याने नवे काय आदेश येतात याकडे लक्ष आहे. यातच आॅनलाईन चुकारे करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाला आग लागल्याचे चुकाºयांची प्रतीक्षा कायमच राहणार असल्याचे दिसते.
- व्ही.पी. आपदेव, जिल्हा मार्केटींग अधिकारी, वर्धा.

Web Title: Pause of online registration of tur purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.