अरबोस ग्रुपने घातला शेतकºयांना लाखोंचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 11:19 PM2017-10-13T23:19:13+5:302017-10-13T23:19:27+5:30

नोकरीच्या नावाखाली जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील शेकडो बेरोजगार तरुण-तरुणींना लाखों रुपयांनी अरबोज ग्रुपने गंडा घातल्याचा प्रकार एक महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता.

 Millions of millions of farmers who have planted Arbose Group | अरबोस ग्रुपने घातला शेतकºयांना लाखोंचा गंडा

अरबोस ग्रुपने घातला शेतकºयांना लाखोंचा गंडा

googlenewsNext
ठळक मुद्देकारवाईसाठी शेतकºयांचे पोलीस अधीक्षकांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नोकरीच्या नावाखाली जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील शेकडो बेरोजगार तरुण-तरुणींना लाखों रुपयांनी अरबोज ग्रुपने गंडा घातल्याचा प्रकार एक महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. त्यावेळी याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली होती. परंतु, अद्याप काय कार्यवाही झाली हे गुलदस्त्यात असून आता सदर ग्रुपने चक्क समुद्रपूर तालुक्यातील काही शेतकºयांची खोटे आमिष देत लाखों रुपयांनी फसवणूक केल्याचे उजेडात आले आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फसवणूक झालेल्या शेतकºयांची आहे.
अरबोस ग्र्रुपच्या सदस्यांनी जिल्ह्यातील अनेक शेतकºयांना त्यांच्या शेतात अश्वगंधा हे उत्पन्न लावण्याचे आमिष देऊन त्यांच्याकडून अकरा महिन्याचा करार करून घेतला. इतकेच नव्हे तर सदर करार करताना शेतकºयांना ‘तुम्हाला लाखों रुपयांचा फायदा होईल’ असे सांगत ‘घेतल्या जाणाºया उत्पन्नाच्या कमीत कमी ३५ टक्के नफा तुम्हाला देऊ’ असेही सांगितले. शेकडो शेतकºयांनी अरबोस ग्रुपच्यावतीने देण्यात आलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेऊन यंदा शेतामध्ये कुठलेच पारंपारीक पीक घेतले नाही. तसेच सदर ग्रुपने करार केलेल्या शेतकºयांच्या शेतात कुठल्याच पिकांची लागवड केली नाही. त्यामुळे यंदाचा हंगामात शेतकºयांना आपल्या शेतजमीनी पडीक ठेवाव्या लागल्या. सदर प्रकारामुळे शेतकºयांवर आर्थिक संकट कोळसले असून त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे फसवणूक झालेल्या शेतकºयांचे म्हणणे आहे. याच ग्रुपने जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील शेकडो बेरोजगार तरुण-तरुणींना नोकरीच्या नावाखाली गंडा घातला असून सदर प्रकार लक्षात येताच फसवणूक झालेले तरुण-तरूणींनी शहर पोलीस ठाणे गाठून याची माहिती पोलिसांना त्यावेळी दिली होती. परंतु, अद्यापही या ग्रुपच्या अधिकाºयांवर कुठलीच प्रभावी कारवाई झाली नसल्याचे फसवणूक झालेल्यांचे म्हणणे आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फसवणूक झालेल्या शेतकºयांसह तरुण-तरुणींची आहे.

सांगितली आपबिती
च्सदर प्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन फसवणूक झालेल्या शेतकºयांनी गुरूवारी पोलीस अधीक्षकांना दिले. पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आलेल्या निवेदनावर अमर चंद्रकांत पसारे, काशीनाथ गो. इटनकर, नितेश सातपुते, प्रमोद देहाकर, सुभाष नवघरे, प्रवीण मेश्राम, विजय नासरे या फसवणूक झालेल्या बेरोजगारांसह अतुल कोल्हे, वासूदेव कोल्हे, प्रमोद देशकर, समीर जुगनाके, रोशन सहस्त्रबुद्धे आदी फसवणूक झालेल्या शेतकºयांची स्वाक्षरी आहे.

सदर प्रकरणी कार्यालयात तक्रार शेतकºयांनी दिली आहे. चौकशी करुन योग्य कारवाई करण्यात येईल.
-निर्मलादेवी एस. पोलीस अधीक्षक,वर्धा

Web Title:  Millions of millions of farmers who have planted Arbose Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.