जिल्हा परिषद शाळेला सीईओंची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 12:44 AM2017-12-24T00:44:39+5:302017-12-24T00:44:51+5:30

हावरे ले-आऊट सेवाग्राम येथील आयएसओ मानांकित जि.प. प्राथमिक शाळेला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांशी अभ्यासावर चर्चा केली.

Meeting of CEOs at Zilla Parishad School | जिल्हा परिषद शाळेला सीईओंची भेट

जिल्हा परिषद शाळेला सीईओंची भेट

googlenewsNext
ठळक मुद्देसेवाग्राम येथील आयएसओ मानांकित जि.प. प्राथमिक शाळेला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी भेट दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : हावरे ले-आऊट सेवाग्राम येथील आयएसओ मानांकित जि.प. प्राथमिक शाळेला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांशी अभ्यासावर चर्चा केली.
विद्यार्थ्यांनी चार अंकी संख्यांचे वाचन व बेरीज केली. मराठीचे जोडशब्द, उतारा वाचन करीत असल्याने पाहून त्यांनी कौतुक केले. ज्ञानरचनावादावर आधारित शब्दपट्ट्या अंककार्ड, शालेय भिंती आदींचे निरीक्षण केले. विद्यार्थ्यांनी लॅपटॉपने स्वयंअध्ययन केले. इतर वर्गांनी शैक्षणिक साहित्याचा वापर करून बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर सोडवून दाखविला. मी कलेक्टर होऊन गरीबांना शौचालय बांधून देईल व शिक्षणाच्या सोई उपलब्ध करून देईल, असे मत इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्याने व्यक्त केले. इतिहास-कालीन तोफेचे वर्णन विद्यार्थ्यांनी केले. इयत्ता दुसरीच्या कार्तिक हागवणे याने तंबाखूचे दुष्परिणामवर माहिती दिली. प्रशांत चुचे याने तंबाखू व दुर्व्यसनाची माहिती दिली. शाळेतील विद्यार्थी प्राणी, पक्षी, वस्तू, आदींचे आत्मकथन करतात, हे पाहून नयना गुंडे आनंदी झाल्या. मुख्य अध्यापिका सुनीता नगराळे व प्रकाश कांबळे यांनी स्व-कष्टाने शाळा प्रगत, आयएसओ, बोलकी व ज्ञानरचनावादी तथा परसबाग केल्याने गुंडे यांनी कौतुक केले. शाळेची प्रगती पाहून त्यांनी विद्यार्थ्यांना खाऊ व भेटवस्तू दिली. लक्ष्मी टोपो हिने छत्तीसगडी भाषेत तर विक्रमसिंह राठोड याने राजस्थानी भाषेत आभार मानले.

Web Title: Meeting of CEOs at Zilla Parishad School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.