"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...

क्रिकेटपासून दूर असलेला भारतीय संघाचा खेळाडू शिखर धवन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 02:42 PM2024-05-25T14:42:23+5:302024-05-25T14:47:42+5:30

whatsapp join usJoin us
  Team India player Shikhar Dhawan has said that there were rumors that Mithali Raj and I are going to get married | "मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...

"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shikhar Dhawan Mithali Raj : सध्या क्रिकेटपासून दूर असलेला भारतीय संघाचा खेळाडू शिखर धवन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे गब्बरने केलेला एक खुलासा. धवन दुखापतीमुळे आयपीएल २०२४ चा संपूर्ण हंगाम खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत सॅम करनने पंजाब किंग्सचे नेतृत्व केले मग एका सामन्यात ही जबाबदारी जितेश शर्माने पार पाडली. शिखर धवनने एका शोमध्ये बोलताना भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजबाबत एक मोठा खुलासा केला आहे. शिखर धवनने सांगितले की, माझ्या लग्नाबद्दल काही अफवा पसरवल्या गेल्या होत्या. मी भारताची माजी कर्णधार मिताली राजसोबतलग्न करणार असल्याचे देखील पसरवण्यात आले. मी आणि मिताली लग्न करणार असल्याची माझ्या जीवनातील सर्वात मोठी अफवा होती. 

क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर मितालीने समालोचनाच्या क्षेत्राकडे तिचा मोर्चा वळवला. याशिवाय ती मार्गदर्शकाच्या भूमिकेतही दिसते. ती महिला प्रीमिअर लीगमध्ये गुजरात लायन्सच्या संघातील शिलेदारांना क्रिकेटचे धडे देते. या कार्यक्रमात बोलताना गब्बर धवनने दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतचे तोंडभरून कौतुक केले. त्याने सांगितले की, पंतने ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात पुनरागमन केले आहे. ज्यापद्धतीने त्याने दुखापतीतून सावरून क्रिकेटकडे कूच केली आहे ते पाहता तो नक्कीच कौतुकास पात्र आहे. तो परत आला आयपीएल खेळला आणि आता भारताकडून खेळताना दिसेल... हा प्रवास आणि त्याची मेहनत पाहून त्याचा अभिमान वाटतो.

पंजाबचा फ्लॉप शो
आयपीएल २०२४ बद्दल भाष्य करायचे तर, शिखर धवनचा संघ हंगामाच्या सुरुवातीपासूनच निराशाजनक कामगिरी करताना दिसला. साखळी फेरीतील सामने संपले त्याक्षणी पंजाब १० संघांच्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर राहिला. धवन या मोसमात केवळ ५ सामन्यात मैदानावर उतरू शकला, ज्यामध्ये त्याने १२५.६१ च्या स्ट्राईक रेटने १५२ धावा केल्या.

दरम्यान, भारतीय महिला क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेण्यात मिताली राजने महत्त्वाची भूमिका बजावली. झुलन गोस्वामी आणि मिताली ही भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील दोन मोठी नावं आहेत. मितालीने अनेकदा मोठ्या व्यासपीठावर टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले. मिताली पर्व संपल्यानंतर भारतीय संघाची धुरा हरमनप्रीत कौर सांभाळत आहे. 

Web Title:   Team India player Shikhar Dhawan has said that there were rumors that Mithali Raj and I are going to get married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.