राज्यातील अनेक एस.टी. चालक-वाहकाची रात्र निघते मंदिरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 11:01 AM2017-12-02T11:01:37+5:302017-12-02T11:02:10+5:30

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मुक्कामी रापमची बस जात असली तरी बहुतांश ठिकाणी चालक व वाहकांना विश्राम करण्यासाठी सुविधाच नसल्याने त्यांची रात्र अनेकदा मंदिरात किंवा वाहनातच निघते. रापमच्या कर्मचाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.

Many STs in the State The driver-carrier's night leaves in the temple | राज्यातील अनेक एस.टी. चालक-वाहकाची रात्र निघते मंदिरात

राज्यातील अनेक एस.टी. चालक-वाहकाची रात्र निघते मंदिरात

Next
ठळक मुद्देरापमच्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज

आॅनलाईन लोकमत
वर्धा: प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मुक्कामी रापमची बस जात असली तरी बहुतांश ठिकाणी चालक व वाहकांना विश्राम करण्यासाठी सुविधाच नसल्याने त्यांची रात्र अनेकदा मंदिरात किंवा वाहनातच निघते. रापमच्या कर्मचाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.
तालुक्यातील अनेक गावांमधील मुक्कामाच्या ठिकाणी एसटी चालक व वाहकासाठी राहण्याची साधी सुविधा नाही. त्यांना मंदिर अथवा बसमध्येच रात्र काढावी लागते. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवाशी घेऊन ते पुढील प्रवासाकरिता निघतात. इतरांना सुविधा देताना ते मात्र असुविधेचा सामना करीत असल्याचे वास्तव आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये बसच्या वाहक व चालकाला रात्र काढण्याकरिता सुविधा नसल्याने त्यांना गावांमधील धार्मिक स्थळे, गावातील बसथांबे किंवा ग्रा.पं. कार्यालयांचा आधार घ्यावा लागतो. बऱ्याचदा वाहक व चालकांजवळ जेवणाचा डबा सोबत राहत नसल्याने मिळेल ते खाद्यपदार्थ सेवन करून त्यांना नागरिकांना सुविधा द्यावी लागते. त्यांच्यासाठी बहूतांश ठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रात्री अनेक गावखेड्यात मुक्कामी जाणाऱ्या वाहक व चालकांना सांगल्या सोई-सुविधा देण्यासाठी रापमच्या वरिष्ठ अधिकाºयांनी योग्य पाऊल उचलत त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी आहे.

Web Title: Many STs in the State The driver-carrier's night leaves in the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.