हॉटेल पेटविले, पाच लाखांचे नुकसान

By admin | Published: October 30, 2015 02:36 AM2015-10-30T02:36:54+5:302015-10-30T02:36:54+5:30

हॉटेल खाली करण्याच्या कारणावरून झालेल्या वादात सावंगी (मेघे) येथील सिल्व्हर स्पून नामक हॉटेल जाळल्याची घटना उघड झाली.

Hotel Petaville, loss of five lakhs | हॉटेल पेटविले, पाच लाखांचे नुकसान

हॉटेल पेटविले, पाच लाखांचे नुकसान

Next

एकावर गुन्हा दाखल : सावंगी (मेघे) येथील घटना
वर्धा : हॉटेल खाली करण्याच्या कारणावरून झालेल्या वादात सावंगी (मेघे) येथील सिल्व्हर स्पून नामक हॉटेल जाळल्याची घटना उघड झाली. यात हॉटेलमालकाचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
येथील सुनील प्रभाकर रा. नालवाडी याने येथील मनोज भेंडारे याच्या मालकीचे हॉटले करारनामा करून सन २०१३ मध्ये पाच वर्षांकरिता भाडेतत्वावर घेतले होते. हॉटेलचा व्यवसाय सुरळीत सुरू असताना मनोज भेंडारे याने हॉटेल खाली करण्याचा तगादा लावला. मनोज सतत हॉटेलमध्ये येत हॉटलमधील साहित्याची फेकाफेक करून धमकावत होता. त्याच्या सोबत नेहमी गुंड प्रवृत्तीचे लोक राहत होते. अशात त्याने बुधवारी हॉटेलात पेटवून दिले. यात हॉटेलमधील साहित्याचा कोळसा झाला. यात प्रभाकर यांचे अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी प्रभाकर यांच्या तक्रारीवरून मनोजवर कलम ४३५, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास सेवाग्राम पोलीस करीत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नसल्याचे सांगण्यात आले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Hotel Petaville, loss of five lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.