राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगापुढे होणार सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 10:23 PM2019-07-15T22:23:56+5:302019-07-15T22:24:18+5:30

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या खंडपीठापुढे बालक हक्क उल्लंघनासंदर्भातील तक्रारीवर १९ जुलैला सुनावणी होणार आहे. गडचिरोली येथे आयोजित या सुनावणीत नागपूर विभागातील सर्वच जिल्ह्यातील प्रकरणे पटलावर राहणार आहेत. यामध्ये वर्ध्यातून दोन प्रकरणे खंडपीठापुढे सादर केली जाणार आहे.

Hearing before the National Commission for Child Rights | राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगापुढे होणार सुनावणी

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगापुढे होणार सुनावणी

Next
ठळक मुद्दे१९ ला गडचिरोलीत बैठक : जिल्ह्यातील दोन प्रकरणे पटलावर

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या खंडपीठापुढे बालक हक्क उल्लंघनासंदर्भातील तक्रारीवर १९ जुलैला सुनावणी होणार आहे. गडचिरोली येथे आयोजित या सुनावणीत नागपूर विभागातील सर्वच जिल्ह्यातील प्रकरणे पटलावर राहणार आहेत. यामध्ये वर्ध्यातून दोन प्रकरणे खंडपीठापुढे सादर केली जाणार आहे.
बालकांच्या हक्कासंदर्भात कठोर पावले उचलत त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता पूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. १९ जुलै रोजी गडचिरोली येथे होणाऱ्या राष्ट्रीय बाल अधिकार सरंक्षण आयोगाच्या खंडपीठाच्या बैठकीस बालक, पालक, आई-वडील, बालकाचे पालकत्व स्वीकारणाऱ्यांनी किंवा इतर व्यक्तींनी तक्रारीसह उपस्थित राहण्यासंबंधी निर्देशही जिल्हाधिकाºयांनी दिले. वर्ध्यातही जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी पोलीस विभाग, शाळाबाह्य मुले, कुपोषित बालके, स्थलांतरित बालके, बालमृत्यू तसेच चाईल्डलाईन फाऊंडेशनच्या हेल्पलाईनवर आलेल्या बालकांच्या तक्रारींचा आढावा घेतला. आतापर्यंत दोन तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील एक तक्रार आरटीई प्रवेशासंदर्भातील असून दुसरी तक्रार चाईल्डलाईनमार्फत आलेली आहे. या दोन्ही तक्रारी बैठकीच्या पटलावर राहणार आहे. या बैठकीला नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हा बाल कल्याण कक्ष अधिकारी, पोलीस अधिकारी, कामगार अधिकारी, बाल कल्याण समितीचे अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व चाईल्डलाईनचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
या तक्रारींचा आहे समावेश
तक्रारीचे प्रकार बाल कामगारांचे निर्मूलन किंवा तणावग्रस्त बालके, बाल न्याय किवा दुर्लक्षित, अपंग, बालकांच्या काळजीबाबत, अ‍ॅसिड हल्ला, भिक्षा मागणे, बालकांचे गैरवर्तन किंवा दुर्लक्ष बालकांच्या काळजी घेणा-या संस्था, बालकांची खरेदी विक्री, बालकांचा मृत्यू, अपहरण, हरविलेले बालक, खून, आत्महत्या, माध्यमांद्वारे नियमांचे व बाल अधिकारांचे उल्लंघन, शिक्षण बालकाच्या संबंधित कायदा, बालकाचे आरोग्य, काळजी, कल्याण आणि विकास, बाल मानसशास्त्र इत्यादी तक्रारींचा समावेश असणार आहे.

बालकाच्या हक्क उल्लंघनाच्या तक्रारी जास्तीत जास्त प्राप्त व्हाव्यात यासाठी ग्रामपंचायत, बालगृहे, शाळा, अंगणवाडी, निवासी बाल वसतीगृह येथे चाईल्डलाईनचा हेल्पलाईन क्रमांक सूचना फलकावर दर्शवून जनजागृती करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.
-विवेक भिमनवार,
जिल्हाधिकारी, वर्धा

Web Title: Hearing before the National Commission for Child Rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.