‘त्या’ कामांची अधिकाऱ्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:33 AM2018-04-07T00:33:52+5:302018-04-07T00:33:52+5:30

येथील ग्रा.पं.च्या माध्यमातून गावात विविध विकास कामे करतेवेळी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याने ‘अल्लीपूर ग्रा.पं.मध्ये भ्रष्टाचाराचा भस्मासूर’ या मथळ्याखाली लोकमतने गुरूवार ५ एप्रिलला वृत्त प्रकाशित केले होते.

Examine the 'work' by the officials | ‘त्या’ कामांची अधिकाऱ्यांकडून पाहणी

‘त्या’ कामांची अधिकाऱ्यांकडून पाहणी

Next
ठळक मुद्देवृत्ताची दखल : निकृष्ट बांधकामाकडे केले जात होते दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
अल्लीपूर : येथील ग्रा.पं.च्या माध्यमातून गावात विविध विकास कामे करतेवेळी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याने ‘अल्लीपूर ग्रा.पं.मध्ये भ्रष्टाचाराचा भस्मासूर’ या मथळ्याखाली लोकमतने गुरूवार ५ एप्रिलला वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेऊन सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करण्यासाठी शासकीय अधिकाºयांची चमु गावात दाखल झाली. यामुळे कंत्राटदार व गैरप्रकार करणाºया ग्रा.पं.च्या लोकप्रतिनिधींमध्ये थोडा का होईलना वरिष्ठ अधिकाºयांबाबत धाक निर्माण झाला होता.
१४ व्या वित्त आयोग नागरी सुविधा २०१७-१८ अंतर्गत अल्लीपूर येथे विविध वॉर्डात खडीकरण व सिमेंटीकरणाची कामे सर्वत्र सुरू आहे. सदर बांधकामात तसेच नाली बांधकामातील सिमेंटीकरण कामाची चौकशी करण्यासंदर्भात पं.स.सदस्य प्रशांत चंदनखेडे यांच्यासह धनराज साखरकर यांनी संबंधितांकडे तक्रार केली होती. होणारा गैरप्रकार गाव विकासासाठी धोक्याचा असल्याने लोकमतनेही वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेऊन हिंगणघाटचे शाखा अभियंता राजेश झाडे यांनी कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सरपंच मंदा पारसडे, उपसरपंच विजय कवडे, ग्रा.पं सदस्य गोपाल मेघरे, वासुदेव कोडापे आदी हजर होते.

पं.स. सदस्य अल्लीपूर यांचे तक्रारीवरून आपण ग्रा.पं. पदाधिकारी व पं.स. सदस्य यांना घेवून रस्ते बांधकामाची चौकशी व पाहणी केली. इस्टीमेटप्रमाणे सदर काम सुरू आहेत. कामात कुठलही गैरप्रकार नाही. पदाधिकारी यांनी हजर राहुन बांधकाम करून घ्यावे.
- राजेश झाडे, उपविभागीय अभियंता, हिंगणघाट, बांधकाम विभाग.

आतीपाती व गावातील इतर रस्ते बांधकाम व पाणी कामाबाबत शंका असल्यामुळे आपण बांधकाम विभागाला चौकशी व पाहणी करण्यासाठी अर्ज दिला. त्यानुसार अभियंता यांनी भेट देऊ रस्त्याची व कामाची प्रत्यक्ष ग्रा.पं. पदाधिकारी यांचेसह पाहणी केली. बांधकाम चांगल्या दर्जाचे होण्यासाठी माझे कर्तव्य म्हणून आपण चौकशी लावली व चौकशी झाली.
- प्रशांत चंदनखेडे, पं.स. सदस्य, अल्लीपूर.

Web Title: Examine the 'work' by the officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.