दूध उत्पादकांचा शासनाविरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 11:58 PM2018-06-06T23:58:09+5:302018-06-06T23:58:09+5:30

तालुक्यातील दूध उत्पादकांनी स्थानिक बसस्थानक चौकात दुधाच्या कॅन रस्त्यावर ओतुन आंदोलन केले. याप्रसंगी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. आंदोलनात तालुक्यातील देवळी, नांदोरा, मुरदगाव, सेलसुरा, ईसापूर, दिघी, बोपापूर, सोनेगाव (बाई) आदी गावातील दूध उत्पादकांचा सहभाग होता.

Elgar against the government of milk producers | दूध उत्पादकांचा शासनाविरोधात एल्गार

दूध उत्पादकांचा शासनाविरोधात एल्गार

Next
ठळक मुद्देभाववाढीसाठी आंदोलन; शेकडो लिटर दूध रस्त्यावर फेकले

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : तालुक्यातील दूध उत्पादकांनी स्थानिक बसस्थानक चौकात दुधाच्या कॅन रस्त्यावर ओतुन आंदोलन केले. याप्रसंगी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. आंदोलनात तालुक्यातील देवळी, नांदोरा, मुरदगाव, सेलसुरा, ईसापूर, दिघी, बोपापूर, सोनेगाव (बाई) आदी गावातील दूध उत्पादकांचा सहभाग होता.
शिवराज्याभिषेक दिवसाचे औचित्य साधुन परिसरातील दूध उत्पादकांनी रस्त्यावर येवून एल्गार केला. अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात नेहमीच सन्मान केला आहे. त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळेल याची काळजी घेतली; परंतु त्यांचा हा मावळा आज आपल्या रास्त मागण्यासाठी संप करीत आहे. विंवेचनेपोटी आत्महत्या करीत आहे. त्यांच्या शेतमालाला, बागायती उत्पादनाला तसेच दुधाला भाव मिळत नसल्याने आर्थिक कोंडीचा सामना करीत आहे. नाफेडच्यावतीने करण्यात येणारी चणा, तूर या पीक मालाची खरेदी थांबविण्यात आल्यामुळे तसेच आधी विकलेल्या मालाचे गत दोन महिन्यांपासून पैसे मिळत नसल्यामुळे जीवन कसे जगावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे आमच्या दुधाला तसेच शेतमालाला योग्य तो भाव द्या, किवां इच्छा मरणाची परवानगी द्या अशी भावनिक हाक या परिसरातील कास्तकारांनी दिली आहे. याप्रसंगी तहसीलदार प्रदीप वर्पे यांना निवेदन दिले.
कास्तकारांनी या आंदोलनादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला. शेतकऱ्यांच्या विरोधात असलेल्या शासनाचा निषेध नोंदविला. या आंदोलनात नगरसेवक पवन महाजन, महादेव कामडी, महेश येळणे, बापू डहाके, संदीप कायरकर, ज्ञानेश्वर कामडी, लोकेश झाडे, निलेश टिपले, आशिष बोकरे, लोकेश मानकर, सुधीर येळणे, नामदेव ठाकरे, पवन दुबे, चेतन तराळे, रूपेश निकाडे, भूषण झाडे, सतीश तायवाडे, भागवत, विलास झाडे यांच्यासह परिसरातील कास्तकारांची उपस्थिती होती.

Web Title: Elgar against the government of milk producers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :milkदूध