वर्धा-आर्वी राज्यमार्गावर खड्ड्यांचा सुकाळ

By Admin | Published: January 24, 2015 11:00 PM2015-01-24T23:00:10+5:302015-01-24T23:00:10+5:30

एक वर्षापूर्वी वर्र्धा-खरांगणा-आर्वी मार्गाचे डांबरीकरण झाले़ हे काम आटोपताच पुन्हा खड्डे पडण्यास सुरूवात झाली़ शिवाय अनेक ठिकाणी पुलांच्या कडांना भगदाडे पडली़ या खचलेल्या

Due to the potholes on the Wardha-Arvi highway | वर्धा-आर्वी राज्यमार्गावर खड्ड्यांचा सुकाळ

वर्धा-आर्वी राज्यमार्गावर खड्ड्यांचा सुकाळ

googlenewsNext

खरांगणा (मो.) : एक वर्षापूर्वी वर्र्धा-खरांगणा-आर्वी मार्गाचे डांबरीकरण झाले़ हे काम आटोपताच पुन्हा खड्डे पडण्यास सुरूवात झाली़ शिवाय अनेक ठिकाणी पुलांच्या कडांना भगदाडे पडली़ या खचलेल्या कडा व खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहे़
वर्धा ते आंजीपर्यंतच्या रस्त्यावर दीड वर्षापूर्वी हॉट मिक्सींचा थर देण्यात आला होता़ येळाकेळी पुलाजवळ गावापर्यंत उखडलेला हा रस्ता ठिगळे लावून जोडण्यात आला़ सुकळी शिवारात रपट्यालगत रस्त्याला लावलेली डांबरीकरणाची ठिगळेही पुन्हा खड्ड्यांत रूपांतरित झालीत़ मजरा-खरांगणा हा चार किमी रस्ता तर खड्ड्यांची मालिकाच झाला आहे़ रस्ता तयार केल्यावर एक पावसाळाही तो सोसू शकला नाही़ गिट्टीवर टाकलेला डांबरी थर कधीच बेपत्ता झाला़ खालच्या जाड खडी कुठे दिसतात तर कुठे खालचा रस्ता चांगला; पण वरची डांबरी लेअर गायब दिसते़ हे खड्डे चुकविणे वाहनधारकांना जीवघेणे ठरत आहे़
सालई-मजरा शिवारानजीक श्रीकृष्ण जिनिंग फॅक्टरीजवळ या राज्यमार्गाच्या निंब पूल नामक रपट्याला एका बाजूला मोठे भगदाड पडले आहे़ रात्री वाहन धारकांना हा खड्डा जीवघेणा ठरत आहे़ दोन दिवसांपूर्वी सिमेंट घेऊन जाणारा एम़एच़ ३२ क्यू़ ६५५ हा २२ चाकी ट्रेलर खड्ड्यांतून वाचविण्यासाठी रोड सोडून शेतात रूतला़ मोरांगणा ग्रा़पं़ जवळील नवीन पुलाच्या कडा मुख्य डांबरी रस्त्यापर्यंत खचल्या़ यामुळे ओव्हरटेकच्या नादात अपघात होण्याची शक्यता बळावली आहे़ तळेगाव-चांदणी-दानापूरपर्यंत चार किमी रस्ता चांगला असला तरी पिंपळखुटा येथे पुलाजवळ रस्ता दबला आहे़ उंच-सखल भागातून वाहने हेलखावे खात समोर जातात़ वाढोणा फाट्याजवळ तर लांब व अर्थगोलाकार डांबरी उंचवटे तयार झाले़ याकडे लक्ष देत दुरूस्ती करणे गरजेचे झाले आहे़(वार्ताहर)

Web Title: Due to the potholes on the Wardha-Arvi highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.