भाजी विक्रेत्यांच्या पसाऱ्यामुळे वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 10:09 PM2019-02-07T22:09:08+5:302019-02-07T22:09:41+5:30

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते विठोबा चौकादरम्यान असलेला श्रीराम टॉकीज चौक रस्ता श्रीराम टॉकीजकडून डांगरी वॉर्ड, सेंट्रल वॉर्डकडे जाणाºया रस्त्यावर दोनही बाजूने भाजी विक्रेत्यांच्या हातगाड्या लावण्यात येत असल्याने हा रस्ता पादचारी, वाहनधारक यांच्यासाठी अडचणीचा ठरत आहे.

Due to the dues of vegetable vendors, traffic congestion | भाजी विक्रेत्यांच्या पसाऱ्यामुळे वाहतुकीची कोंडी

भाजी विक्रेत्यांच्या पसाऱ्यामुळे वाहतुकीची कोंडी

Next
ठळक मुद्देपालिकेचे दुर्लक्ष : १६ फुटांचा रस्ता झाला ८फूट

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते विठोबा चौकादरम्यान असलेला श्रीराम टॉकीज चौक रस्ता श्रीराम टॉकीजकडून डांगरी वॉर्ड, सेंट्रल वॉर्डकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोनही बाजूने भाजी विक्रेत्यांच्या हातगाड्या लावण्यात येत असल्याने हा रस्ता पादचारी, वाहनधारक यांच्यासाठी अडचणीचा ठरत आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करावा अशी नागरिकांची मागणी आहे.
या मार्गावर दररोज दुपारी तसेच सोमवारी व्यावसायिकांचीच गर्दी दिसून येते. नगर पालिकेच्या १६ फुट बनविलेल्या डांबरी रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने थाटलेली दुकाने आणि याच रस्त्यावर अगदी मधोमध भाजी विक्रेत्यांच्या बंड्यांच्या रांगा यामुळे रस्त्यात रहदारी करण्यासाठी बंड्यांच्या एका बाजूला पाच ते सहा फुटाची उरलेली जागा तर दुसºया बाजूला चार ते पाच फुटाची जागा शिल्लक राहते. यात भाजी खरेदी करणाºयांची दुचाकीवरून असलेली खरेदी आणि उरलेल्या जागेतून जुन्या वस्तीतून येजा करण्यासाठी २० हजार लोकसंख्या असलेल्या जुनी वस्तीच्या नागरिकांसाठी एकमेव संपर्क रस्ता आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत जायला किंवा बाजारपेठेतून घरी यायला हाच मार्ग आहे.
गेल्या तीन वर्षांपासून या मार्गावर किरकोळ भाजी विक्रेत्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी दुकाने लावून रस्ताच ८ फुटाचा ठेवला आहे. हाच मार्ग पुढे श्रीराम टॉकीज चौकात जातो तेव्हा तर तेथे तर दोन्ही बाजूनी भाजी बाजाराची दुकाने असतात. त्याशिवाय रस्त्याच्या मधोमध भाजीच्या बंड्या लावून भाजीची विक्री रस्त्यावरच केल्या जाते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी उरलेल्या अत्यंत अरूंद गल्लीतूनच रहदारी पुढे सरकते. या उलट भाजी बाजाराकरिता नव्याने बांधलेले ओटे गेल्या ३ ते चार महिन्यांपासून आवंटीत न केल्यामुळे तसेच पडून आहेत.

रहदारीसाठी अडचण
नगर परिषद हिंगणघाटने आठवडी बाजारात सिमेंट रस्त्याची व्यवस्था, मुख्य रस्त्याचे रूंदीकरण, आणि भाजी विक्रेत्यांसाठी सिमेंटचे ८ ओटे बांधले परंतु समस्या मात्र जैथे थेच आहेत. तीन ते चार महिन्यांपासून हे ओटे बांधून झाले असले तरी त्याच्या आवंटनाची प्रक्रिया अद्याप प्रतिक्षेतच आहे. त्यामुळे आठवडी बाजारा लगतच्या मु्ख्य रस्त्यावरील रहदारीचा प्रश्न मात्र सुटला नाही. याउलट सर्वात अधिक गर्दी तेथेच होते. दिवसभर वाहतुकीसाठी खोळंबा होतो. तिथूनच जाणारी दुचाकी, कार यांना तर वाहतुकीच्या अडचणींना नेहमीच त्रास होतो
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेकर चौक ते विठोबा चौकादरम्यान असलेल्या श्रीराम आॅकीज चौककडून सेंट्रल डांगरी वॉर्डाकडे जाणाºया रस्त्याची रहदारीला जुन्या वस्तीच्या रहिवाशांनी हा रस्ता मोकळा करावा अशी मागणी केली आहे.

शोभेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे
जुनी श्रीराम टॉकीज चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. परंतु त्याचा काहीच उपयोग आतापर्यंत झाला नाही. चौकात व पुढे रस्ता मोकळा ठेवण्याची वाहतुक पोलिसांची जबाबदारी हिंगणघाटच्या पोलीस प्रशासनाची असून ते या कार्यात निष्क्रीय ठरले आहेत.

Web Title: Due to the dues of vegetable vendors, traffic congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.