सीएम वॉररूममुळे निम्न वर्धाच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 10:33 PM2018-12-22T22:33:12+5:302018-12-22T22:34:46+5:30

वर्धा जिल्ह्यातील आर्वी, देवळी, वर्धा, हिंगणघाट आदी तालुक्यासाठी वरदान ठरू पाहत असलेला निम्न वर्धा प्रकल्प पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजना व मुख्यमंत्री यांच्या वॉररूममध्ये या प्रकल्पाचा समावेश असून जून २०१९ पर्यंत............

Due to the CM Warroom the speed of the work of Wardha | सीएम वॉररूममुळे निम्न वर्धाच्या कामाला वेग

सीएम वॉररूममुळे निम्न वर्धाच्या कामाला वेग

Next
ठळक मुद्देपंतप्रधान कृषी सिंचन योजना : जिल्ह्यातील चार तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : वर्धा जिल्ह्यातील आर्वी, देवळी, वर्धा, हिंगणघाट आदी तालुक्यासाठी वरदान ठरू पाहत असलेला निम्न वर्धा प्रकल्प पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजना व मुख्यमंत्री यांच्या वॉररूममध्ये या प्रकल्पाचा समावेश असून जून २०१९ पर्यंत सिंचन निर्मितीची कामे व जून २०२० पर्यंत पाटसºयांचीे कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत, अशी माहिती प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता ग. म. घुगल यांनी लोकमतशी बोलताना दिली.
जल है तो कल है, पाणी वाचवा पाण्याचा काटकसरीने उपयोग करा, यासारखे कार्यक्रम मागील तीन वर्षांत राबवून या भागातील शेतकºयांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा संदेश दिला जात आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भूसंपादनात अडचणी निर्माण होत असल्याने सिंचन निर्मितीच्या उर्वरित निविदा काढता येत नाही. त्यामुळे कामाला गती देण्यासाठी अडचणीच्या ठिकाणी कायद्याने जमीन संपादित करण्याचे प्रस्तावित आहे. या भागातील मोझरी, शेकापूर, अलमडोह, टाकळी चणा, गंगापूर, टाकळी दरणे, आंजी मोठी आदी गावांतील प्रकल्पाच्या अंत्यभागात पाणी मिळत नसल्याच्या तक्रारींची दखल घेऊन मागणीनुसार पाण्याचे नियोजन करण्यात आले.
त्यामुळे गौळ, कोळोणा, अडेगाव, गंगापूर, पिंपळगाव, दापोरी, गिरोली, अंबोडा, खानगाव, वरूड, पोटी, मोझरी, शेकापूर, कापसी, कोसुर्ला, टाकळी दरणे, अलमडोह आदी गावांतील लोकांना आवश्यकतेनुसार पाणी देणे शक्य झाले. रब्बीचे सिंचन सुरू असताना काही लोकांनी खानगाव वितरिका व नांदगाव वितरिकेचे दरवाजे खराब केल्यामुळे आलेल्या तांत्रिक अडचणी दूर सारून कास्तकारांना पाणी देण्यात आले, अशी माहिती घुगल यांनी दिली.
शेतकºयांना पाणी वेळेवर मिळण्याचे दृष्टीने प्रकल्पाअंतर्गत वितरिका व लघुकालव्याच्या दरवाज्यांची कास्तकारांनी उघडझाप करू नये, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आल्या असून सिंचनाच्या या कार्यात सर्वांनी मदत करावी. पाण्यावर सर्वांचा हक्क लक्षात घेता नियोजनाच्या माध्यमातून काटकसरीचे उदाहरण घालून द्यावे, असे आवाहन उपविभागीय अभियंता घुगल यांनी केले. यंदा पुर्वीच समाधानकारक पाऊस न झाल्याने जलशय तळ दाखवत आहेत.

मागील तीन वर्षांत २० हजार हे.आर. शेतजमीन सिंचनाखाली
प्रकल्पाच्या माध्यमातून मागील तीन वर्षांत २० हजार हे.आर. शेतजमीन सिंचनाखाली आली. याचा प्रत्यक्ष लाभ कास्तकारांना मिळला. धरणात केवळ २८ टक्के जलसाठा उपलब्ध असतानासुध्दा कास्तकारांच्या मागणीनुसार खरीप व रब्बी हंगामात प्रत्येकी एक पाळी याप्रमाणे पाणी देण्याचे नियोजन करण्यास अभियंत्यांचे परिश्रम मोलाचे ठरले आहे.
प्रकल्पाची सिंचन क्षमता ६३ हजार ३३३ हे. आर असून यामध्ये आर्वी उपसा सिंचन व खर्डा बॅरेज मिळून सिंचन होणार आहे. यावर्षीच्या जून पर्यंत ३४ हजार ८७० हे. आर. क्षेत्रात सिंचन झाले आहे. उर्वरित २८ हजार ४६३ हेक्टर आर. ची कामे प्रगतिपथावर आहेत.

आर्वी तालुक्यातील धनोडी येथे वर्धा नदीवर निम्न वर्धा प्रकल्पाचे काम पूर्णत्वास जात आहे. या प्रकल्पावर ४५ कि.मी. चा डावा कालवा, ३८ कि.मी. चा देवळी शाखा कालवा व २६ कि.मी. च्या गिरोली शाखा कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन या प्रकल्पांतर्गत पुलगाव येथे पुलगाव बॅरेज तसेच सिंचनासाठी वंचित राहणाºया गावासाठी खर्डा बॅरेज व आर्वी उपसा सिंचनाचा समावेश आहे.
- ग. म. घुगल, उपविभागीय अभियंता, निम्न वर्धा प्रकल्प.

Web Title: Due to the CM Warroom the speed of the work of Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.