निराधारांचे मानधन बंद झाल्याने अपंग संजयवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 10:21 PM2018-08-08T22:21:35+5:302018-08-08T22:23:11+5:30

येथील अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या अपंग संजयचे मागील सहा महिन्यांपासून निराधाराचे मानधन बंद झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आर्थिक परीस्थिती माणसाला बदलु शकते परंतु शारीरीक अपंगत्व आले तर असंख्य अडचणीचा सामना करावा लागतो.

Due to the closure of the dependents, the time of starvation on the disabled Sanjay | निराधारांचे मानधन बंद झाल्याने अपंग संजयवर उपासमारीची वेळ

निराधारांचे मानधन बंद झाल्याने अपंग संजयवर उपासमारीची वेळ

Next
ठळक मुद्देअपंगत्वामुळे भोगतो मरणयातना : आत्महत्येची मागितली परवानगी

सचिन देवतळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विरूळ (आकाजी) : येथील अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या अपंग संजयचे मागील सहा महिन्यांपासून निराधाराचे मानधन बंद झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
आर्थिक परीस्थिती माणसाला बदलु शकते परंतु शारीरीक अपंगत्व आले तर असंख्य अडचणीचा सामना करावा लागतो. यातही अपंगत्व जर एखाद्या घरात आले तर त्याला उपचार करणे ही कठीण जाते असाच प्रकार विरुळ येथील संजय दाभाडे या तरुणाच्या बाबत घडला आहे.
संजय हा इतरासारखा सुदृढ व मेहनती तरुण होता. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला हा तरुण अंग मेहनतीचे काम करुन आपल्या म्हाताऱ्या आई वडीलांचे व आजारी बहीणीचे पोट भरत होेता. म्हातारपणामुळे आई वडीलांनी जगाचा निरोप घेतला व काही दिवसातच आजारपणामुळे बहीणीने जगाचा निरोप घेतला. त्यामुळे बहीणीच्या दोन लहाण मुलींची जबाबदारी त्यावर आली ही जबाबदारी तो यशस्वीपणे पार पाडत असतांना संजय आजारी पडला व या आजारपणात त्याला कायमचे अपंगत्व आले. घरच्या बिकट परिस्थितीमुळे तो उपचार करु शकला नाही. संजयला आता उभेही राहता येत नाही जमीनीवर घुसुन त्याला पुढे जावे लागते. शेजारील व्यक्ती त्याला उचलुन नेतात. शासनाच्या सहाशे रुपये निराधाराच्या मानधनावर तो कसाबसा जगत असतांना मागील सहा महिन्यांपासुन त्याचे निराधाराचे मानधन बंद झाले. तो आर्थिक अडचणीत अडकला आहे. मानधन सुरु करावे म्हणुन तो सबंधित अधिकाºयांना विनवणी करीत आहे मात्र शासनाचे निगरगट्ट अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे त्याने शासनाला आत्महत्या करण्याची परवानगी मागीतली आहे. तहसील व बँकेचे कर्मचारी त्याला हे कागद पत्र आणा ते पत्र आणा म्हणुन त्रास देत आहे त्याला जाग्यावरुन उठताच येत नाही त्यामुळे तो कागदपत्राची पुर्तता करु शकत नाही. त्यात त्याचे राहते घर ही कोसळण्याच्या मार्गावर आहे अपंग कोट्यातून घरकुल मिळावे यासाठी त्यांनी अनेकदा शासनाकडे अर्ज सादर केला परंतु अजुनही घरकुल मिळाले नाही. अशा बिकट स्थित तो मरणयातना सहन करीत जगत आहे.

Web Title: Due to the closure of the dependents, the time of starvation on the disabled Sanjay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.