जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा

By Admin | Published: September 10, 2016 12:38 AM2016-09-10T00:38:43+5:302016-09-10T00:38:43+5:30

जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा स्थानिक क्रीडा संकुल येथे घेण्यात आल्या.

District-level school boxing competition | जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा

जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा

googlenewsNext

सुवर्ण पदक प्राप्त खेळाडू विभागीय खेळणार
वर्धा : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा स्थानिक क्रीडा संकुल येथे घेण्यात आल्या. यात मुला व मुलींचे १४, १७, १९ वर्षांखालील वयोगट करण्यात आले. या स्पर्धेतून सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूची विभागीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे.
१४ वर्षाखालील वयोगटात मुलांमधून क्षितीज बाणमारे, अनिरूद्ध चिडके, ऋषी देशमुख, पियुष मिटकरी, अब्रार खान, अभिषेक पांडे, निशांत खोत यांनी सहभागी वजन गटात प्रतिस्पर्धांवर मात करीत सुवर्णपदक मिळविले. तसेच १७ वर्ष वयोगटात ऋद्रेश लांडगे, रेक्स डिसुजा, श्रेयस देशमुख, गौरव भरणे, राजूकुमार शर्मा यांनी विजय मिळविला. तर १९ वर्षाखालील गटात विश्वजित पवार, कुणाल कलोडे, सुब्रतो ढेंगरे, आयुष कुबडे, मोहित सिंग यांनी विजय साकारला.
मुलींच्या गटात सायली नखाते, वैष्णवी काटकर, पायल गावंडे, स्माईली फुले यांनी प्रतिस्पर्धांवर विजय मिळविताना विभागीय स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला. स्पर्धेकरिता क्रीडा संकुलचे रवींद्र काकडे, रवी डोबाळे यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: District-level school boxing competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.