शहराच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 01:04 AM2017-12-10T01:04:12+5:302017-12-10T01:04:35+5:30

न. प. निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पक्षाने पुलगाववासीयांना शहर विकासाची ग्वाही दिली होती. शहर विकासाचा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन गत वर्षभऱ्यात शहरात विविध कामे करण्यात आली आहेत. पुलगाव शहराच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध आहे, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी दिली.

BJP is committed to the development of the city | शहराच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध

शहराच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध

googlenewsNext
ठळक मुद्देराजेश बकाने : पत्र परिषदेतून दिली वर्षभºयाच्या कामाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : न. प. निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पक्षाने पुलगाववासीयांना शहर विकासाची ग्वाही दिली होती. शहर विकासाचा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन गत वर्षभऱ्यात शहरात विविध कामे करण्यात आली आहेत. पुलगाव शहराच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध आहे, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी दिली. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुलगाव नगर पालिकेवर भाजपाची सत्ता आल्यापासून शहरवासीयांना मुलभूत सोई-सूविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ते न.प. प्रशासनाचे कर्तव्यही आहे. अल्पसंख्याक बहुल क्षेत्र, दलित वस्तीसुधार योजना, सृजल पाणी पुरवठा योजना, सार्वजनिक आरोग्य आदी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील फडणवीस सरकार कोट्यावधींचा निधी देत आहे. नुकतेच स्थानिक न.प. ला वैशिष्टपूर्ण कामासाठी विशेष अनुदानापोटी १० कोटींचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे.
भाजपाने नागरिकांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पुलगाव शहराच्या विकासासाठी प्रयत्नही होत आहेत. अल्पसंख्याक बहुल क्षेत्र विकासांतर्गत वॉर्ड क्रं. १ मध्ये बोहरा समाज कब्रस्थानमध्ये १२ लाख ४३ हजार रूपये खर्चाचे सभागृह तसेच रस्ते, दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत वॉर्ड क्रं. १५ मध्ये १९ लाख ६३ हजार खर्चाचे मोठ्या नाल्यांचे बांधकाम, आठवडी बाजराच्या बांधकामासाठी ९६.८१ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत वॉर्ड क्रं.१३ मध्ये ४३.११ लाख रूपये खर्चाचे मोठ्या नाल्यांच्या बांधकाम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष शितल गाते, न.प. उपाध्यक्ष आशिष गांधी, गट नेता राजीव जयस्वाल, संजय गाते, नितीन बडगे, मंगेश झाडे, राजीव बत्रा, नगरसेवक गौरव दांडेकर, भगवान भेंडारकर, जयभारत कांबळे, माधुरी इंगळे आदी उपस्थित होते.

Web Title: BJP is committed to the development of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.