भाजप अन् काँग्रेसला संमिश्र कौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:06 PM2019-03-25T23:06:28+5:302019-03-25T23:06:57+5:30

ग्रा.पं. निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. या निकालात भाजप व काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या आघाड्यांना ग्रामीण मतदारांनी पसंती दिली आहे. वर्धा शहरालगत असलेल्या ग्रा.पं.मध्ये अनेक ठिकाणी सत्तांतर झाले असून नालवाडी ग्रा.पं. काँग्रेस आघाडीने राखली तर बोरगाव (मेघे) सिंदी (मेघे), पवनार या ग्रा.पं.मध्ये सत्तांतरण झाले आहे.

BJP and Congress combine | भाजप अन् काँग्रेसला संमिश्र कौल

भाजप अन् काँग्रेसला संमिश्र कौल

Next
ठळक मुद्देदेवळी, हिंगणघाट तालुक्यात काँग्रेसची सरशी : बोरगाव (मेघे), सिंदी (मेघे) येथे सत्तांतर

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ग्रा.पं. निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. या निकालात भाजप व काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या आघाड्यांना ग्रामीण मतदारांनी पसंती दिली आहे. वर्धा शहरालगत असलेल्या ग्रा.पं.मध्ये अनेक ठिकाणी सत्तांतर झाले असून नालवाडी ग्रा.पं. काँग्रेस आघाडीने राखली तर बोरगाव (मेघे) सिंदी (मेघे), पवनार या ग्रा.पं.मध्ये सत्तांतरण झाले आहे.
कारंजा तालुक्यात भाजपने अनेक जागी ग्रा.पं.वर झेंडा रोवला. तर देवळी तालुक्यात काँग्रेस व भाजपात तगडी लढाई झाली. यात काँग्रेस सरस ठरली. पढेगाव येथे मागील १५ वर्षांपासून असलेली सत्ताही गेली. सेलू तालुक्यात रेहकी येथे भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. भाजपाने ७० टक्के ग्रा.पं. जिंकल्याचा दावा जिल्हाध्यक्षांनी केला आहे. आर्वी तालुक्यात २२ पैकी ११ ग्रा.पं. काँग्रेसचा विजय झाल्याचा दावा काँग्रेस समर्थकांनी केला आहे. जिल्ह्यातील आठही तालुका स्थळी ग्रा.पं.च्या सरपंचांसह ग्रा.पं. सदस्यपदाचा मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. तर पराजय पाहावा लागल्याने उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी आपण कुठे कमी पडलो, याबाबत आत्मपरीक्षण केले.
दोन उमेदवारांची निवड ईश्वरचिठ्ठीने
पवनार येथील वॉर्ड क्रमांक ३ मधील उमेदवार शालिक जनार्दन उमाटे व रामभाऊ केशवराव मगर यांना प्रत्येकी ३१७ मत मिळाली. दोघांनाही एकसारखे मत मिळाल्याने तालुका निवडणूक निर्णय अधिकारी प्रीती डुडुलकर व सहाय्यक शकुंतला पाराजे यांच्या उपस्थितीत गोंदिया येथील एसआरपीचे जवान दीपक वºहाडे यांच्या हस्ते ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यात रामभाऊ मगर हे विजयी झाले. तर तिगाव येथील वॉर्ड ३ मधील उमेदवार वैशाली अरविंद डोळसकर व सविता प्रभु जाधव यांना ११६ मत मिळाली. दोघांनाही समान मत मिळाल्याने वैभव दिनेश राऊत या मुलाच्या हस्ते ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यात वैशाली डोळसकर हे विजयी झाले.
५० पोस्टल मते ठरली अवैध
वर्धा तालुक्यातून एकूण १८५ पोस्टल मत लिफापे पाठविण्यात आले होते. त्यापैकी १७० पोस्टल मतदानाची लिफापे प्राप्त झाली होती. त्याची अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता १२० पोस्टल मत वैध ठरतली तर ५० मत अवैध ठरल्याचे सांगण्यात आले.
नालवाडीत सुनीता मेहरे (तडस) विजयी
भारतीय जनता पक्ष प्रणित पॅनलचा नालवाडीत धुव्वा उडाला, मात्र वॉर्ड क्रमांक ४ मधून सुनीता मेहरे (तडस) विजयी झाल्या आहे. या वॉर्डात भाजप प्रणित पॅनलचे तिन्ही उमेदवार विजयी झालेत. भाजपप्रणित पॅनलला नालवाडी ग्रां.प.मध्ये सहा जागा मिळाल्या. बाळकृष्ण माऊस्कर गटाने ९ जागांवर विजय मिळविला.
दोघांनी नोंदविला आक्षेप
गोजी येथे एका प्रभागात प्रत्यक्ष मतदान ४६६ झाले; पण मतमोजणीदरम्यान ४६७ मतदान झाल्याचे निदर्शनास आल्याचा आरोप करीत पुन्हा मतमोजणीस आक्षेप नोंदविण्यात आला. शिवाय नेरी येथेही मतात तफावत येत असल्याचा आक्षेप नोंदविण्यात आल्यानंतर तालुका निवडणूक निर्णय अधिकारी प्रीती डुडुलकर यांच्या उपस्थितीत गोजी व नेरी येथील मतदान पेट्या बोलावून पुन्हा मतमोजणी करण्यात आली होती.
भूगावसह रसुलाबाद येथे प्रहारचे उमेदवार विजयी
वर्धा तालुक्यातील भूगाव व आर्वी तालुक्यातील रसुलाबाद ग्रा.पं. मध्ये सरपंचासह नऊ आणि ८ ग्रा.पं. सदस्य विजयी झाल्याचे प्रहारचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे यांनी कळविले आहे.
हे आहेत वर्धा तालुक्यातील विजयी सरपंच
वर्धा तालुक्यातील ५५ ग्रा.पं.च्या निवडणुकीची मतमोजणी स्थानिक सिव्हिल लाईन भागातील क्रीडा संकुलाच्या सभागृहात १५ टेबलवरून करण्यात आली. वर्धा शहराशेजारी असलेल्या बोरगाव (मेघे) ेयेथे सरंपच म्हणून संतोष सेलूकर, नालवाडीत प्रतिभा बाळकृष्ण माऊस्कर, आंजी (मोठी) येथे जगदीश संचेरिया, आमला येथे विठ्ठल इंगळे, कामठी येथे चंद्रकला वसंत इवनाथे, पवनूर येथे रमेश कारणकर, पेठ येथे इंदूबाई बलवंत ठाकरे, तिगाव येथे जयंत इंगळे, बोरगाव (सा.) येथे प्रणाली महेश मोरे, लोणसावळी येथे सचिन कृष्णराव जाधव, कुरझडी (फो.) येथे अमीत रेवतकर, बोदड येथे अतुल नाईक, केळापूर येथे सुनीता मसराम, दहेगाव (स्टे.) येथे राजणी गावंडे, वायफड येथे विजय राऊत, सेलसुरा येथे सचिन महादेव काळे, पवनार येथे शालिनी आदमणे, सिंदी (मेघे) येथे कीर्तीध्वज सवाई, सावंगी (मेघे) येथे मीनाक्षी जिंदे, इंझापूर येथे दीपक तपासे, बरबडी येथे संगीता शिंदे, करंजी (भोगे) येथे सोनल भोगे, कुटकी येथे ज्योती मेश्राम, खरांगणा (गो.) येथे कुमुद सुरेश गोडे, मांडवगड येथे कोमल रमेश दारोडे, भुगाव येथे दुर्गा थुल, मदनी येथे ललित कुरेकर, भानखेडा येथे निलेश भालकर, सावली (सा.) येथे नीता संदीप शिंदे, तरोडा येथे शुभांगी सुभाष चांभारे, येसंबा येथे सत्यवान हरी भगत, गोजी येथे शुभांगी गणोरे, धोत्रा (कासार) येथे उज्ज्वल निळकंठ गुरनुले, सेलूकाटे येथे विनय रंगराव तळवेकर, नेरी (मि.) येथे प्रणिता यशवंत गावंडे, वायगाव (नि.) येथे कल्पना प्रविण काटकर, वडध येथे अनुप जनार्दन वडतकर, सिरसगाव (ध.) येथे शुभांगी अमोल उघडे, सोनेगाव (स्टे.) येथे धनपाल भस्मे, तळेगाव (टा.) येथे कष्णा गुजरकर, एकुर्ली येथे लता हिंगे, धोत्रा (रेल्वे) येथे सुरेखा प्रविण फुलझेले, पडेगाव येथे अनंत मधुकर हटवार, निमगाव येथे ज्योती गुणवंत करपाते, भिवापूर येथे श्रीकांत ज्ञानेश्वर पाल, कुरझडी (जा.) येथे देवेंद्र सुभाष चौधरी, महाकाळ येथे सूरज माधवराव गोहो व सेवाग्राम येथे सुजाता गणेश ताकसांडे या विजयी झाल्याचे सांगण्यात आले.

Web Title: BJP and Congress combine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.