अटल पेन्शन योजना वृद्धापकाळासाठी नवसंजीवनी ठरणारीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:28 AM2018-06-27T00:28:36+5:302018-06-27T00:30:00+5:30

गरीब, असंघटीत क्षेत्रातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, दारिद्र रेषेखालील कुटुंबातील सदस्यांना वृद्धापकाळात सुखी करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे.

The Atal Pension Scheme is not only meant for old age | अटल पेन्शन योजना वृद्धापकाळासाठी नवसंजीवनी ठरणारीच

अटल पेन्शन योजना वृद्धापकाळासाठी नवसंजीवनी ठरणारीच

googlenewsNext
ठळक मुद्देरामदास तडस : विशेष मेळावा; तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गरीब, असंघटीत क्षेत्रातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, दारिद्र रेषेखालील कुटुंबातील सदस्यांना वृद्धापकाळात सुखी करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा गरजुंनी लाभ घ्यावा. ही योजना वृद्धापकाळासाठी नवसंजीवनीच ठरणारी आले, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले. ते अटल पेन्शन योजना मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते.
भारतीय स्टेट बँक आॅफ इंडिया, वर्धा मुख्य शाखा द्वारे अटल पेन्शन योजना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर प्रादेशिक व्यवस्थापक जोरा सिंग, क्षेत्रीय प्रबंधक नागपूर मीना, वर्धेचे मुख्य व्यवस्थापक बहिरशेठ, शाखा व्यवस्थापक पुरेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
खा. तडस पुढे म्हणाले, अटल पेन्शन योजना ही मुदतीनंतर दरमहा ठराविक परतावा देणारी एक सरकारी पेन्शन योजना आहे. जे वर्गणीदार १८ ते ४० या वयोगटात वर्गणी भरत आहेत, त्यांच्या वर्गणीच्या प्रमाणात कायमस्वरूपी १ हजार ते ५ हजार प्रतीमाह पेन्शन मिळेल. या योजनेत केंद्र सरकार कमीत-कमी १ हजार किंवा वार्षिक वर्गणीच्या ५० टक्के रक्कम जमा करणार आहे. याला लाभ गरजुंनी घेतला पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य व्यवस्थापक बहिरशेठ यांनी केले तर उपस्थितांचे आभार शाखा व्यवस्थापक पुरेकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: The Atal Pension Scheme is not only meant for old age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.