...आणि चक्क मुलींनीच पार पाडला वडिलांचा अंत्यविधी    

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 09:32 PM2017-11-03T21:32:08+5:302017-11-03T21:32:46+5:30

वर्धा : सेलू तालुक्यातील हिंगणी येथे राहणारे दिवाकर गुलाब कुंभारे (६०) यांचे २ नोव्हेंबरच्या रात्री निधन झाले.

... and the father's funeral passed by the girls | ...आणि चक्क मुलींनीच पार पाडला वडिलांचा अंत्यविधी    

...आणि चक्क मुलींनीच पार पाडला वडिलांचा अंत्यविधी    

Next

वर्धा : सेलू तालुक्यातील हिंगणी येथे राहणारे दिवाकर गुलाब कुंभारे (६०) यांचे २ नोव्हेंबरच्या रात्री निधन झाले. त्यांना सहाही मुली असल्याने खांदा देण्यापासून ते मुखाग्नी देण्यापर्यंतचे विधी मुलींनीच पार पाडले. वायगाव निपाणी येथील निवासी दिवाकर कुंभारे हे कर्करोगाने पीडित होते.

त्यांना सहाही मुली असल्याने हल्ली ते हिंगणी येथील जावई संजय बोकडे यांच्याकडे अनेक वर्षांपासून वास्तव्यास होते. त्यांनी आपली सगळ्यात लहान मुलगी आशा कडेच अखेरचा श्वासही सोडला. मुलगा नसल्याने अंत्यविधी कोण पार पाडणार याच्यावर सर्व मुलींनी एकत्रितपणे विचार करून हा विधी आम्हीच पार पडू, असा निर्णय घेतला.

हिंगणी गावातील हा असा दुसरा प्रसंग असल्याचे सांगितले जाते. अखेरचा निरोप देण्यासाठी नातेवाईकांसह गावातील नागरिक मोक्षधाम येथे उपस्थित होते.

Web Title: ... and the father's funeral passed by the girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.