तीन दिवसानंतरही मनात आगीची धग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 08:38 PM2018-11-10T20:38:18+5:302018-11-10T20:40:03+5:30

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्टेशन चौकात लागलेल्या आगीत पाच दुकानासह दोन घरांची राखरांगोळी झाली. या आगीत व्यापाऱ्यांचे जवळपास ७ कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे.

After three days, there was a fire in the mind | तीन दिवसानंतरही मनात आगीची धग कायम

तीन दिवसानंतरही मनात आगीची धग कायम

Next
ठळक मुद्देव्यापाऱ्यांमध्ये संताप : उघड्या डोळ्यांनी उद्ध्वस्त होणारा व्यवसाय बघणाºयांवरच केले गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्टेशन चौकात लागलेल्या आगीत पाच दुकानासह दोन घरांची राखरांगोळी झाली. या आगीत व्यापाऱ्यांचे जवळपास ७ कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई व शासकीय मदत मिळणे तर दुरच,पण पोलिसांनी शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवत तीन व्यावसायिकांसह अन्य २२ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.
आगीने जवळपास सात कोटींचे नुकसान केल्यामुळे व्यापारपेठेतील व्यावसायीक चांगलेच व्यथीत झाले आहे. स्टेशन चौकातील व्यापारपेठेत या घटनेचा कमालीचा परिणाम दिसून येत आहे. स्थानिक प्रशासनाने कर्तव्यात कसर ठेवल्याचा तर पोलीस प्रशासनाने चोर सोडून सन्यासाला फाशी देण्याचा प्रकार अंगिकारुन दंडुकेशाही केल्याचा आरोप नागरिकांकडून केल्या जात आहे. नगर पालिकेच्या अग्नीशामक दलाची वाईट अवस्था यावेळी दिसून आली. जर पालिकेच्या अग्नीशामक यंत्रणेने तातडीने दखल घेतली असती तर या आगीने सौम्यरूप घेऊन नुकसान टळले असते. ही आग फटाक्यांच्या ठिणगीने लागल्याची चर्चा असून या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या अग्नीशामक दलाचे जवान व माजी सैनिकांनी अथक परिश्रम घेतले.
तर स्टेशन चौकातील युवा व्यापाऱ्यांनी व सामाजिक दायित्वाच्या भावनेतून काही समाज सेवकांनीही हातभार लावला. रात्री ग्रस्तीवर असणाऱ्या पोलीसांनी घटनेच्या वेळी बंदोबस्त ठेवून जमावावर संतुलीतपणे नियंत्रण ठेवण्यापेक्षा आग पाहण्यासाठी आलेल्या मंडळीसमोर आपल्या अकार्यक्षमतेचे प्रदर्शन केल्याने काही व्यापाऱ्यांचा मालही लंपास झाल्याची चर्चा आहे. जळालेल्या अवशेषांपैकी काही अवशेष संधीसाधू मंडळींनी लंपास केल्याचीही चर्चा आहे.
आमदारांनी जाणल्या व्यथा
आमदार रणजीत कांबळे यांनी शनिवारी आगग्रस्त व्यापाऱ्यांची भेट घेतली. यावेळी व्यापाºयांनी समस्या मांडल्या. व्यापाऱ्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात पोलीस अधीक्षकांशी चर्चा करुन आगग्रस्तांना आपादग्रस्त निधीतून मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे आ. कांबळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. चारुलता टोकस यांनी आगग्रस्तांची भेट घेवून व्यथा जाणून घेतल्या.

Web Title: After three days, there was a fire in the mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग