बोगस डॉक्टरवर अन्न व औषधी विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 01:01 AM2017-09-22T01:01:46+5:302017-09-22T01:01:55+5:30

महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर अ‍ॅक्ट अंतर्गत कोणतीही परवानगी तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत कोणताही परवाना नसताना अ‍ॅलोपॅथिक औषधाचे वितरण करीत असलेल्या देवळी तालुक्यातील अंदोरी...

Action on the bogus doctor and the department of medicines | बोगस डॉक्टरवर अन्न व औषधी विभागाची कारवाई

बोगस डॉक्टरवर अन्न व औषधी विभागाची कारवाई

Next
ठळक मुद्देदेवळी येथील डॉक्टर : मुदतबाह्य अ‍ॅलोपॅथी औषधी, फिजीशयन सॅम्पल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर अ‍ॅक्ट अंतर्गत कोणतीही परवानगी तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत कोणताही परवाना नसताना अ‍ॅलोपॅथिक औषधाचे वितरण करीत असलेल्या देवळी तालुक्यातील अंदोरी येथील बोगस डॉक्टरवर अन्न व औषधी विभागाने कारवाई केली. या डॉक्टरचे नाव विलास लक्ष्मन नांदे असे आहे.
अन्न व औषध प्रशासनाने मिळालेल्या माहितीनुसार औषध निरीक्षक तथा सहाय्यक आयुक्त (अतिरिक्त कार्यभार), शहनाज खलील ताजी यांच्या मार्गदर्शनात डॉ. विलास नांदे चालवित असलेल्या अंदोरी स्थित स्वागत क्लिनीकची तपासणी केली. तपासणीच्यावेळी या डॉक्टराच्या क्लिनीकमध्ये बराचसा मुदतबाह्य अ‍ॅलोपॅथिक औषधीचासाठा तसेच वैद्यकीय सामुग्री मिळून आली. डॉ. नांदेकडे अ‍ॅलोपॅथिक औषधांचे वितरणाकरिता महाराष्ट्र मेडिकल प्रॉक्टीशनर अ‍ॅक्ट अंतर्गत परवानगी तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत कोणताही परवाना उपलब्ध नसून फक्त डिप्लोमा इन इलेक्ट्रोहोमियोपॅथी मॅडिसीनचे प्रमाणपत्र आढळले. यावरुन डॉ. नांदे अवैधरितीने अ‍ॅलोपॅथीक वैद्यकीय व्यवसाय करून व मुदतबाह्य औषधीचे वितरण रुग्णांना करून त्यांच्या जीवाशी खेळ करीत असल्याचे आढळले. ते जनहिताच्या व रुग्णांच्या आरोग्यास हानिकारक असल्याचे दिसून आले. तपासणीच्या वेळी आढळलेला संपूर्ण अ‍ॅलोपॅथीक औषधीचा सुमारे ७२ हजार ९६७ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. तसेच सदर बोगस डॉक्टरांकडे जप्त केलेल्या औषधीसाठ्याचे खरेदी बिल उपलब्ध नव्हते. या प्रकरणी देवळी पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
सदर कारवाई मोहन केकतपुरे, सहआयुक्त(औषधे) नागपूर व पी.एम. बल्लाळ, सहाय्यक आयुक्त (औषधे) नागपूर यांच्या मार्गदर्शनात केली.

घरीही आढळला औषधीसाठा
क्लिनीकला लागून असलेल्या डॉ. नांदेच्या घराची तपासणी केली असता येथे मुदतबाह्य अ‍ॅलोपॅथिक औषधी, फिजीशियन सॅम्पल, सलाईनच्या बॉटल्स, सिरप, एन्टीबायोटिक टेबलेट, केप्सुल, आयव्ही सेटस व इतर औषधांचा साठा अवैधरित्या साठविलेला असल्याचे दिसून आले.

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व नियम १९४५ चे नियम ६५ अंतर्गत किरकोळ औषधी विक्रेत्यांना अ‍ॅलोपॅथीक औषधांची विक्री मान्यता प्राप्त रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर यांच्या प्रिस्क्रीप्शनवरुन रुग्णाना व घाऊक विक्रेत्यांना लिखीत मागणी पत्रावरून क्लिनीकला पुरवठा करणे बंधनकारक आहे. सदर प्रकरणी तपासाअंती आढळलेल्या सर्व पुरवठादार व इतर संबंधित विक्रत्यांविरुद्ध तसेच कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन करणाºया पुरवठादारांविरुद्ध सदर कायद्यांतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येईल.
- शहनाज खलील ताजी, सहाय्यक आयुक्त(औषधे), अन्न व औषध प्रशासन, वर्धा

Web Title: Action on the bogus doctor and the department of medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.