नऊ कोटी रुपयांतून डॉ. आंबेडकर उद्यानाचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:45 PM2018-03-10T23:45:57+5:302018-03-10T23:45:57+5:30

शहरातील सिव्हील लाईन परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानावर नगर पंचायतीच्यावतीने प्रारंभी अर्धा कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. एक उत्तम उद्यान म्हणून उदयास आलेल्या या जागेला राजकीय वितुष्टामुळे खिळ बसली.

9 crores rupees to Dr. Transformation of Ambedkar garden | नऊ कोटी रुपयांतून डॉ. आंबेडकर उद्यानाचा कायापालट

नऊ कोटी रुपयांतून डॉ. आंबेडकर उद्यानाचा कायापालट

Next
ठळक मुद्दे१४ वर्षांपासून वाद होता न्यायालयात : शहरवासीयांची अद्ययावत उद्यानाची प्रतीक्षा संपली; वाद मिटविण्यात वर्धा पालिकेला यश

ऑनलाईन लोकमत
वर्धा : शहरातील सिव्हील लाईन परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानावर नगर पंचायतीच्यावतीने प्रारंभी अर्धा कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. एक उत्तम उद्यान म्हणून उदयास आलेल्या या जागेला राजकीय वितुष्टामुळे खिळ बसली. नगर परिषदेत भाजपची एक हाती सत्ता आल्याने आता या उद्यानाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला. अमृत योजना व सेवाग्राम विकास आराखड्या अंतर्गत उद्यानाच्या विकासासाठी ९ कोटी रुपये मंजूर झाले आहे. या उद्यानाच्या कामांना लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
सन २००५ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष सुनीता इथापे यांनी ३० लक्ष रुपये खर्च करून या उद्यानाचा विकास साधला होता. यावेळी नागरिकांना २ रुपये शुल्क आकारून उद्यानात जाण्याची सुविधा देण्यात आली होती. दरम्यान एका नगरसेवकाच्या कुटुंबाला शुल्क भरणे कमीपणा वाटल्याने वाद उफाळला. या वादातून पालिकेत ठराव घेत उद्यानाची देखभाल करणाºया महिला बचत गटाकडून कारभार काढण्यात आला होता. त्या काळापासून हा वाद कायमच होता.
हा वाद न्यायालयात गेल्याने १४ वर्षांपासून उद्यानाला अवकळा आली होती. तब्बल १४ एकराच्या या परिसरात बेशरमची झुडपे, लव्हाळ, काटेरी झाडे उगवल्याने उद्यान की, झुडपी जंगल असा प्रश्न येथे येणाºयांना पत होता. आता ९ कोटी रुपयांतून त्याचा विकास होणार आहे. वर्धा शहरात राबविण्यात येणाºया अमृत योजनेतून ४ कोटी आणि सेवाग्राम विकास आराखड्यातून ५ कोटी रुपये या कामाकरिता मंजूर करण्यात आले आहे.
या विकास कामाचा भूमिपूजन समारंभ रविवारी होणार आहे. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे व इतर नगरसेवक तथा पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
रंगीन कारंजे आणि चिमुकल्यांसाठी खेळणी
शहरात सर्व सुविधायुक्त एकही बालोद्यान नसल्याने शहरात येणाºया पर्यटकांना बसण्याची व त्यांच्या पाल्यांना खेळण्यासाठी जागा नव्हती. ही बाब वर्धेकरांना बोचणारी होती. शिवाय येथे घडणाºया अवैद्य प्रकारामुळेही परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. या उद्यानाच्या विकासाची मागणी होत असल्याने नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी ही समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. ही समस्या मार्गी लागली असून या उद्यानात संगीतावर चालणारे रंगीन कारंजे, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाक व फिरण्यासाठी आकर्षक ट्रॅक विविध प्रजातीची झाडे आणि चिमुकल्यांना खेळण्यासाठी विविध खेळणी लावण्यात येणार असल्याची माहिती आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे असलेल्या या उद्यानाला १४ वर्षांपासून अवकळा आली होती. या संदर्भात विविध संघटनांची आणि न्यायालयात गेलेल्या बचत गटाशी चर्चा करून हा वाद निवळण्यात यश आले. दरम्यानच्या काळात अमृत योजनेंतर्गत विकास कामे करताना हिरवळ निर्माण करण्याचा निर्णय असल्याने या उद्यानाचा कायापालट करण्याचे संकल्पना डोक्यात आली. तेथूनच अद्यावत उद्यान निर्माण करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. याला पालकमंत्र्यांनीही पाठबळ दिले.
- अतुल तराळे, नगराध्यक्ष, वर्धा

Web Title: 9 crores rupees to Dr. Transformation of Ambedkar garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.