‘समास २०१८’मध्ये देशातील ६२५ प्रतिनिधी सहभागी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 10:43 PM2018-01-22T22:43:20+5:302018-01-22T22:44:39+5:30

सेवाग्राम येथे ३० जानेवारी रोजी ‘समास २०१८’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

In the '2018', 625 representatives from across the country will participate | ‘समास २०१८’मध्ये देशातील ६२५ प्रतिनिधी सहभागी होणार

‘समास २०१८’मध्ये देशातील ६२५ प्रतिनिधी सहभागी होणार

Next
ठळक मुद्देकार्यक्रमाच्या पूर्वतयारीची बैठक : विविध विषयांवर चर्चा

आॅनलाईन लोकमत
वर्धा : सेवाग्राम येथे ३० जानेवारी रोजी ‘समास २०१८’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यास कार्यक्रमात देशातील ६२५ प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यासाठीच्या पूर्वतयारीची विशेष बैठक शनिवारी गोपुरी भागातील गांधी विचार परिषदेच्या सभागृहात घेण्यात आली. याप्रसंगी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर संपूर्ण जगभरात हल्ले होत आहेत. यामुळे संवेदनशील व लोकशाहीला मुलभूत जीवन मूल्य माणणाऱ्यांनी एकत्र येण्याचा विचार करावा, ही काळाची गरज आहे. सदर विचाराचे आपल्या देशातील नाव दक्षिणायण असून या विचारांचे देशातील विविध भागातील ६२५ प्रतिनिधी ‘समास २०१८’ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत कार्यक्रमानिमित्त सेवाग्राम येथे येणाऱ्या महिला व पुरुष प्रतिनिधींची निवास, त्यांचे भोजन आदींची व्यवस्था, सदस्य नोंदणी करून घेण्याची व्यवस्था आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान भोजन कुपण व भोजन व्यवस्थेची जबाबदारी मोहन खैरकार यांच्याकडे सोपविण्यात आली. सदस्यांची नोंदणी करून घेणे व आलेल्या प्रतिनिधींची नियोजित पाच ठिकाणी निवासाच्या व्यवस्थेची जबाबदारी अतुल शर्मा यांच्याकडे सोपविण्यात आली. कार्यक्रम पत्रिका व प्रतिनिधींना ये-जा करण्यासाठी देण्यात येणारी बस सेवेची जबाबदारी प्रा. राजेंद्र मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आली. देशातील विविध भागातून येणाºया प्रतिनिधींना सेवाग्राम परिचय पुस्तिका देण्यात येणार असून त्याची जबाबदारी जयवंत मठकर यांना देण्यात आली. ठिकठिकाणी लावण्यात येणारे सूचना फलक तयार करण्याची जबाबदारी सुशील फत्तेपुरीया यांना देण्यात आली. कार्यक्रमानिमित्त येणाऱ्या प्रतिनिधींना आरोग्य सेवेची गरज पडल्यास त्यांना त्वरित चांगली आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी डॉ. सुगन बरंठ यांना देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
याप्रसंगी समास २०१८ या कार्यक्रमानिमित्त उर्वरित विषयांवर संबंधितांची वेळोवेळी पुन्हा चर्चा करण्यात येणार असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले. बैठकीला गांधी विचार परिषदेचे भरत महोदय, डॉ. सुगन बरंठ, विभा गुप्ता, मुरलीधर बेलखोडे, विजय तांबे, रवींद्र रु.पं., प्रदीप खेलुरकर, सुशील फत्तेपुरीया, भावेश चव्हाण, मोहन खैरकार, डॉ. राजेंद्र मुंडे, विनोद काकडे, हरिष इथापे आदी उपस्थित होते.

Web Title: In the '2018', 625 representatives from across the country will participate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.