१३,७४२ जणांवर मोकाट श्वानांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:39 AM2018-03-10T00:39:41+5:302018-03-10T00:39:41+5:30

जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरासह विविध शहारांमध्ये व गावांमध्ये सध्या बेवारस श्वानांचा मुक्त संचार होत आहे. श्वानांनी चावा घेतल्याने अ‍ॅन्टी रेबीज नामक प्रतिबंधात्मक लस १२ महिन्यात १३ हजार ७४२ नागरिकांना टोचण्यात आली आहे.

13,742 people have been killed in the attack | १३,७४२ जणांवर मोकाट श्वानांचा हल्ला

१३,७४२ जणांवर मोकाट श्वानांचा हल्ला

Next
ठळक मुद्देनागरिकांचा संतप्त सवाल : बेवारस कुत्र्यांचा बंदोबस्त केव्हा?

महेश सायखेडे ।
ऑनलाईन लोकमत
वर्धा : जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरासह विविध शहारांमध्ये व गावांमध्ये सध्या बेवारस श्वानांचा मुक्त संचार होत आहे. श्वानांनी चावा घेतल्याने अ‍ॅन्टी रेबीज नामक प्रतिबंधात्मक लस १२ महिन्यात १३ हजार ७४२ नागरिकांना टोचण्यात आली आहे. श्वानांच्या हैदोसामुळे बच्चेकंपनीसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने बेवारस श्वानांचा बंदोबस्त केव्हा, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.
दिवस भर अन्न व पाण्याच्या शोधार्थ भटकंती करणारे बेवारस श्वास अनेकदा छोट्या मुला-मुलींच्या अंगावर धावून जातात. इतकेच नव्हे तर रात्रीच्या सुमारास ते दुचाकी व चारचाकी वाहनांच्या मागे धावतात. अचानक वाहनावर धावलेल्या श्वानामुळे वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून छोटे-मोठे अपघात झाल्याची बरीच उदाहरणे आहेत. गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाºयांनाही रात्री उशीरापर्यंत कर्तव्य बजावताना बेवारस श्वानांचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे वास्तव आहे. बेवारस श्वास बच्चेकंपनी व नागरिकांच्या अंगावर धाव घेऊन बहूदा चावा घेत असल्याने या प्रकाराकडे लक्ष देत संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी विशेष मोहीम हाती घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी जिल्ह्यातील सुजान नागरिकांची आहे.
आता १४ ऐवजी ५ इंजेक्शन
श्वान चावल्यास पूर्वी रुग्णाला पोटावर १४ इंजेक्शन न चुकता घ्यावे लागत होते. परंतु यात संशोधन झाल्याने रुग्णाला केवळ पाचच प्रतिबंधात्मक लस असलेले इंजेक्शन न चुकता घ्यावे लागतात अशी माहिती आरोग्य विभागाच्या सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे रुग्णालाही मोठा दिलासा मिळाला आहे.
रेबीजवर रामबाण औषध नाही
रेबीजची लागण झालेला श्वान माणसाला चावल्यास हा रोग माणसाला होतो. कुत्र्यांच्या लाळीमुळे रोगाचा प्रसार होत असून रेबीज हा रोग अत्यंत घातक व महाभयंकर आहे. सदर रोग मानवास किंवा पशुंना झाल्यास खूप हाल होऊन त्याला मरण येते. रेबीज रोगावर कोणतेही खात्रिदाक औषध नाही. केवळ रेबीज होऊ नये यासाठी प्रतिबंधक लस टोचून घेणे हाच एकमेव इलाज आहे.
रेबीजची लक्षणे दिसतात ९० ते १७५ दिवसात
रेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी असलेल्या श्वान, ससा, माकड, मांजर आदी चावल्यानंतर होणारा रोग आहे. या रोगामध्ये रुग्ण पाण्याला घाबरत असल्याने त्याला जलसंत्रास असेही म्हटले जाते. रेबीज हा रोग श्वानांनाही होतो. श्वानांमधून तो माणसात पसरणारा हा रोग असून या आजाराची लक्षणे ९० ते १७५ दिवसांमध्ये दिसतात
श्वानांच्या लाळेद्वारे ‘जलसंत्रास’ रोगाचा प्रसार
रेबीज या रोगाला ‘जलसंत्रास’ असेही संबोधले जाते. या आजाराची लक्षणे ९० ते १७५ दिवसात दिसतात. जंगलातील लांडगे जंगली श्वानांना चावतात त्यामुळे जंगली श्वानांना रेबीज होतो. ही जंगली श्वान गावातील श्वानांना चावतात त्यामुळे त्यांना हा रोग होतो. शिवाय माणसाला चावल्यास माणसाला हा रोग होत असून श्वानांच्या लाळेद्वारे रोगाचा प्रसार होत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: 13,742 people have been killed in the attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.