आरोपीचा एनकाउंटरमध्ये मृत्यू; पोलिसांनी मोठ्या थाटामाट लावले त्याच्या मुलीचे लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 03:53 PM2024-03-04T15:53:13+5:302024-03-04T15:54:02+5:30

कॉन्स्टेबलची हत्या करणाऱ्या आरोपीचा केला खात्मा, नंतर त्याच्याच मुलीच्या लग्नाची घेतली जबाबदारी.

uttar-pradesh-jalaun-criminal-daughter-marriage-organized-by-orai-police-who-killed-an-encounter | आरोपीचा एनकाउंटरमध्ये मृत्यू; पोलिसांनी मोठ्या थाटामाट लावले त्याच्या मुलीचे लग्न

आरोपीचा एनकाउंटरमध्ये मृत्यू; पोलिसांनी मोठ्या थाटामाट लावले त्याच्या मुलीचे लग्न

UP Police News : तुम्ही अनेकदा उत्तर प्रदेशपोलिसांच्या एनकाउंटरच्या घटना ऐकल्या असतील. पण, आता युपीतील जालौन जिल्ह्यात पोलिसांचे वेगळे रुप पाहायला मिळाले आहे. पोलिसांनी एनकाउंटरमध्ये ठार झालेल्या गुन्हेगाराच्या मुलीचे मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिले. पोलीस अधिकारी पूर्णवेळ लग्नात उपस्थित होते. अगदी स्वागतापासून ते निरोपापर्यंतची सर्व व्यवस्था त्यांनीच केली. 

मिळालेल्या माहितीनुसार, 10 मे 2023 रोजी हायवे पोलीस चौकीजवळ कर्तव्यावर असलेले कॉन्स्टेबल भेदजीत सिंग यांची हत्या झाली होती. या प्रकरणात रमेश राईकवार आणि कल्लू अहिरवार, अशी हल्लेखोरांची नावे समोर आली. घटनेच्या चार दिवसांनंतर पोलिसांनी तपास सुरू असताना ओराई औद्योगिक परिसरात रमेश आणि कल्लू सापडले. 

यावेळी पोलिसांनी दोन्ही आरोपींचा खात्मा केला. रमेश अहिरवार याच्या घरात कोणीही कमावणारा सदस्य नव्हता. त्याच्या मृत्यूनंतर दोन्ही मुली आणि मुलगा निराधार झाले. गावातील लोकांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ही बाब कळताच त्यांनी माणुसकी दाखवत मुलीच्या लग्नाची जबाबदारी स्वत:च्या हातात घेतली.

रमेश यांची मोठी मुलगी शिवानी हिचे गेल्या शनिवारी लग्न झाले. तिच्या लग्नाचा संपूर्ण खर्च पोलिसांनी उचलला. रमेशच्या एनकाउंटरमध्ये सहभागी असलेले सीओ गिरजा शंकर त्रिपाठी आणि इन्स्पेक्टर शिवकुमार राठौर हेदेखील लग्नातील पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी स्वतः तेथे उपस्थित होते. एवढंच नाही तर लग्नात सुमारे 5 लाख रुपयांच्या वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. लग्नानंतर वधू शिवानी आणि शिवानीच्या आईने एसपी आणि सीईओचे आभार मानले. 

Web Title: uttar-pradesh-jalaun-criminal-daughter-marriage-organized-by-orai-police-who-killed-an-encounter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.