मातेसह तीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 08:57 PM2017-09-19T20:57:06+5:302017-09-19T20:57:52+5:30

दसºयाचे धुणे धुण्यासाठी गेलेल्या मातेसह ३ मुलींचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि़) येथे मंगळवारी घडली

Three girls drowned in the water with their mother | मातेसह तीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू

मातेसह तीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देउस्मानाबाद जिल्ह्यातील घटनादसºयाचे धुणे बेतले जीवावर

नळदुर्ग (जि़उस्मानाबाद) : दसºयाचे धुणे धुण्यासाठी गेलेल्या मातेसह ३ मुलींचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि़) येथे मंगळवारी घडली आहे़ रात्री ८ वाजेपर्यंत तीन मुलींचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला होता़
सलगरा (दि़) येथील छायाबाई मधुकर चव्हाण (३५) या आपल्या शीतल (१९), मनिषा (१६) व अश्विनी (१४) तीन मुलींसह मंगळवारी दुपारी दसºयाचे धुणे धुण्यासाठी शेतातील विहिरीवर गेल्या होत्या़ सायंकाळपर्यंत त्या परत न आल्याने शोध घेतला असता त्यांचे मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले़ ही घटना तातडीने नळदुर्ग पोलिसांना कळविण्यात आली़ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने शीतल, मनिषा व अश्विनीचा मृतदेह बाहेर काढला़ रात्री उशिरापर्यंत छायाबाई यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला नव्हता, अशी माहिती नळदुर्ग पोलिसांनी दिली़ तिन्ही मुलींचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी सलगरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले़ याबाबत रात्री उशिरापर्यंत नळदुर्ग पोलिसांत नोंद घेण्याची प्रक्रिया सुरु होती़

Web Title: Three girls drowned in the water with their mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.