Lok Sabha Election 2019 : रवी गायकवाड यांना शिवसेनेने तिकिट नाकारल्याने समर्थकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 03:44 PM2019-03-23T15:44:45+5:302019-03-23T15:47:57+5:30

तिकीट नाकारल्याने खासदार गायकवाड समर्थक व्यथित 

Lok Sabha Election 2019 :Ravi Gaikwad supporter attempting suicide due to rejected the ticket by Shivsena | Lok Sabha Election 2019 : रवी गायकवाड यांना शिवसेनेने तिकिट नाकारल्याने समर्थकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Lok Sabha Election 2019 : रवी गायकवाड यांना शिवसेनेने तिकिट नाकारल्याने समर्थकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

उमरगा (जि़उस्मानाबाद) : उस्मानाबादचे खासदार रवी गायकवाड यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांच्या समर्थकांत संतप्त भावना निर्माण झाली आहे़ शनिवारी भूमिका ठरविण्यासाठी आयोजित उमरगा येथील मेळाव्यात एका समर्थकाने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला़

विद्यमान खासदार रवी गायकवाड यांना उमेदवारी नाकारुन सेनेने माजी आ़ओम राजेनिंबाळकर यांना उमेदवारी देऊ केली आहे़ यावरुन खासदार समर्थक प्रचंड नाराज झाले आहेत़ पुढे काय करायचे? हे ठरविण्यासाठी शनिवारी त्यांच्या समर्थकांनी उमरगा येथील एका मंगल कार्यालयात मेळावा आयोजित केला होता़ या मेळाव्यात पक्षांतर्गत विरोधी गटावर टीकेचे तुफान बाण चालले़ दरम्यान, मेळावा संपुष्टात येत असतानाच खासदार गायकवाड यांच्या बाबा भोसले नामक समर्थकाने ‘तिकिट पाहिजेच’ असा घोष करीत सोबत आणलेल्या बाटलीतील रॉकेल अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला़ मात्र, कार्यकर्त्यांनी या समर्थकास तातडीने रोखले़ दरम्यान, स्थानिक पोलिसांनी मेळाव्याच्या ठिकाणी जमलेल्या काही इतर कार्यकर्त्यांकडूनही चार ते पाच रॉकेलच्या बाटल्या जप्त केल्या आहेत़

Web Title: Lok Sabha Election 2019 :Ravi Gaikwad supporter attempting suicide due to rejected the ticket by Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.