​या देशांमध्ये फिरायला जाण्यासाठी गरज नाही ‘व्हिसा’ची !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2017 08:35 AM2017-06-10T08:35:12+5:302017-06-10T14:05:12+5:30

असे काही देश आहेत, ज्याठिकाणी जायायला भारतीयांना व्हिसा लागत नाही. जाणून घेऊया त्या देशांबाबत.

These countries do not need to go for a walk! | ​या देशांमध्ये फिरायला जाण्यासाठी गरज नाही ‘व्हिसा’ची !

​या देशांमध्ये फिरायला जाण्यासाठी गरज नाही ‘व्हिसा’ची !

Next
ong>-Ravindra More
विदेशात फिरायला जायायचे म्हटले म्हणजे गरज असते ती व्हिसाची. बरेचजण व्हिसा लागत असल्याने विदेशात फिरायला जात नाहीत. मात्र असे काही देश आहेत, ज्याठिकाणी जायायला भारतीयांना व्हिसा लागत नाही. जाणून घेऊया त्या देशांबाबत. 

Image result for इंडोनेशिया
* इंडोनेशिया
दक्षिणपूर्व आशियाचा हा देश भारतीयांना व्हिसा आॅन अराव्हल देतो. येथील बालीचे समुद्र किनारे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. सोबतच येथे हजारो वॉलकॅनिक आइलॅँडदेखील आहेत. 

Image result for * फिजी
* फिजी
फिजी एक परफेक्ट हॉलिडे डेस्टिनेशन आहे. या ठिकाणचे खास वैशिट्ये म्हणजे येथे ३३३ ट्रॉपिकल आयलॅँड आहे. सोबतच या ठिकाणचे जगातील सर्वात सुंदर समुद्र किनारे आणि स्पाजमध्येही एन्जॉय करु शकता. 


* जमैका
या कॅरेबियन देशात डोंगर, रेनफॉरेस्ट आणि रीफ लाइन्ड बीचेस आहेत. याठिकाणी आपण खूपच कमी खर्चात नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ शकतात.

Related image
* डॉमिनीका
या कै रिबियाई आयलॅँड देशात नैसर्गिक हॉट स्प्रिंग्स आणि रेनफॉरेस्ट आहे. याठिकाणी येऊन आपण खºया निसर्गाचा आनंद घेऊ शकता. 

Related image
* थायलॅँड 
याठिकाणीही पर्यटकांना व्हिसा आॅन अराव्हल दिला जातो. याठिकाणी ट्रॉपिकल बीच, रॉयल पॅलेस आणि भगवान बुद्धांचे मंदिर खूपच सुंदर आणि जगप्रसिद्ध आहे. 

Image result for मालदीव
* मालदीव
बॉलिवूड कलाकारांचे खास हॉलिडे डेस्टिनेशन म्हणजे मालदीव होय. याठिकाणी आल्यानंतर पर्यटकाला व्हिसा आॅन अराव्हल दिला जातो. येथील समुद्र किनारे आणि सीनिक ब्यूटी जगात प्रसिद्ध आहेत. 

Web Title: These countries do not need to go for a walk!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.