मराठी चित्रपट म्हटला की, शूटिंगसाठी प्राधान्यक्रम असतो तो कोल्हापूर, सातारा आणि मुंबई. मात्र आता या शहरांबरोबरच पुण्याचाही विचार होऊ लागला आहे. ही निकड ओळखून पुणे करांनी खास शूटिंगसाठी नव्या कोऱ्या बंगल्यांची उभारणी केली आहे.शहराच्या मध्यभागाबरोबरच कोरेगाव पार्क, कोंढवा, कॅम्प, खडकवासला, पानशेत, औंध, बालेवाडी, पौड फाटा इथले बंगले शूटिंगसाठी ‘हिट’लिस्टवर आहेत. इतर शूटिंग पुण्याबाहेर होत असलं, तरी बंगला पुण्यातलाच हवा अशी आग्रहाची मागणी होते असते. या बंगल्यांमध्ये ‘रेस्तराँ’, ‘दुनियादारी’, ‘वायझेड’, ‘फॅमिली कट्टा’, ‘वायझेड’, ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’, ‘पितृऋण’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’, ‘मुरांबा’ आदी चित्रपटांचं शूटिंग झालंय. चित्रपट किंवा आगामी चित्रपटाचा ट्रेलर पाहाताना हे बंगले कळत नकळत आपल्या मनात भरुन जातात.

 
Web Title: 'These' bungalows in Pune are on the hit list!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.