पुरी ते कोणार्क रोड ट्रिप एन्जॉयमेंटसाठी बेस्ट ऑप्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 02:51 PM2018-12-15T14:51:45+5:302018-12-15T14:52:36+5:30

जर तुम्ही या हिवाळ्यात एखाद्या रोड ट्रिपचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास पर्याय घेऊन आलो आहोत. तो पर्याय म्हणजे पुरी ते कोणार्क.

Puri to Konark best option for road trip | पुरी ते कोणार्क रोड ट्रिप एन्जॉयमेंटसाठी बेस्ट ऑप्शन!

पुरी ते कोणार्क रोड ट्रिप एन्जॉयमेंटसाठी बेस्ट ऑप्शन!

Next

(Image Credit : Pinterest)

जर तुम्ही या हिवाळ्यात एखाद्या रोड ट्रिपचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास पर्याय घेऊन आलो आहोत. तो पर्याय म्हणजे पुरी ते कोणार्क. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर वेगवेगळ्या गोष्टींसाठी खास आहे. मंदिरांचं शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शहराबद्दल म्हटलं जातं की, १२ महिन्यात १३ उत्सव साजरे केले जातात. आणि प्रत्येक उत्सवाचा अंदाज वेगळा ठरतो. जर तुम्हालाही भुवनेश्वर फिरण्याची मिळत असेल तर मिस करु नका. 

पुरी ते कोणार्क रोड ट्रिप

जर तुम्ही भुवनेश्वरला गेलात तर पुरी ते कोणार्क हा १५९ किमीचा साधारण ६ ते ७ तासांचा प्रवास तुमहाला करावा लागेल. पुरीचा जुना रस्ता जास्त एन्जॉयफुल आहे. ज्यावरुन जाताना तुम्हाला रस्त्याच्या कडेला लागलेली उंचच उंच नारळाची झाडे, गावातील छोटी छोटी घरे, शेती-बागा बघायला मिळतात.  

धौलपुरी

धौलपुरीमध्ये एक जुनं बौद्ध स्मारक आहे. द पीस पॅगोडा हे स्मारक सम्राट अशोकाने तयार केलं होतं. कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्विकारला होता. हे स्मारक त्याचीच निशाणी आहे. येथील सूर्योदय आणि सुर्यास्त दोन्ही बघण्यासारखे असतात. 

पीपली गांव

धौलपुरीहून पुढे निघाल्यावर तुम्हाला पीपली गाव लागेल. सुंदर आणि छोटं असलेलं हे गाव त्यांच्या सजावटीच्या साहित्यासाठी प्रसिद्ध आहे. रस्त्याने जाताना हे गाव सहज बघितलं जाऊ शकतं. पीपली या गावातील लोकांनी या निमित्ताने जुनी कला जिवंत ठेवली आहे. यातून त्यांना रोजगारही मिळतो.

सखीगोपाल गाव

पुढे गेल्यावर तुम्हाला सखीगोपाल हे गाव लागेल. हे गावही फार मोठं नाहीये, पण सखीगोपाल मंदिरामुळे चांगलंच लोकप्रिय आहे. इथे अनेक छोटे छोटे ढाबे आहेत, जिथे तुम्ही पोटपूजा करु शकता. या गावाच्या बाजूलाच एक चंदनपूर गाव आहे. जिथे तुम्ही जैन पद्धतीचे पदार्थ खाऊ शकता. 

येथून पुढे गेल्यावर पवित्र शहर पुरी लागतं. येथील रथयात्रा जगभरात प्रसिद्ध आहे. इथे जगन्नाथ मंदिराला आवर्जून भेट द्या. तसेच येथील गोल्डन बीच हा जगातल्यात सर्वात चांगल्या बीचपैकी एक आहे. त्यामुळे इथे लोकांची नेहमीच गर्दी बघायला मिळते.   

इथे जाऊन तुम्ही प्रसिद्ध स्टोन कारवर्स ऑफ ओडिशाला भेट द्या. इथे तुम्हाला ३० रुपयांपासून ते ३० लाखांपर्यतच्या वस्तू खरेदी करता येतील. तसेच बेलेशोर आणि रामाचंदी ही दोन मंदिरे समुद्रकिनारी आहेत. हा संपूर्ण परिसर जंगलाने व्यापलेला आहे. 

कोणार्कचं सुवर्ण मंदिर

पुढे प्रवास करुन तुम्ही कोणाच्या ब्लॅक पॅगोडा आणि चंद्रभाग बीचवर पोहोचाल. तसेच कोणार्कमध्ये फार जुनं सूर्य मंदिर आहे, जे फारच सुंदर आहे. हे मंदिर बघण्यासाठी देश-विदेशातून लोक येतात. हा तुमच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा असेल. 

कधी जाल?

पुरी ते कोणार्कच्या प्रवासासाठी ऑक्टोबर ते जानेवारी महिना परफेक्ट टाइम आहे. भुवनेश्वर, हे जवळपास सर्वच मोठ्या शहरांच्या रस्त्यांशी जोडलेलं आहे. पुरी ते कोणार्क हा प्रवास केवळ रस्ते आणि रेल्वे मार्गानेच करता येतो. इथे बाइक्स आणि कार फार कमी किंमतील रेन्टने मिळतात. 
 

Web Title: Puri to Konark best option for road trip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.