आसाममध्ये असलेले काजीरंगा नॅशनल पार्कची खासियत म्हणजे इथे एक शिंग असलेले गेंडे बघायला मिळतात. तुम्हाला वाइल्डलाइफची आवड असेल, जंगलात फिरण्याची आवड असेल तर तुम्ही इथे भेट देऊ शकता. या नॅशनल पार्कमध्ये हे एका शिंगाचे गेंडे फार सहजपणे बघायला मिळतात. त्यामुळे हे ठिकाण केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. या वेगळेपणामुळे यूनेस्कोने हे ठिकाण १९०५ मध्ये वर्ल्ड हेरिटेजमध्ये सामिल केलं होतं. 

काजीरंगा नॅशनल पार्क

उंचच उंच गवत, दलदल असलेलेा परिसर आणि दाट जंगल असलेलं हे नॅशनल पार्क ४३० स्क्वेअर किमी परिसरात पसरलेलं आहे. इथे साधारण २२०० गेंडे आहेत. गोलाघाट आणि नागोन जिल्ह्यात हा नॅशनल पार्क आहे. एका शिंगाच्या गेंड्याऐवजी इथे तुम्ही हत्ती, जंगली म्हशी आणि हरीणांच्या वेगवेगळ्या प्रजाती बघू शकता. काही वर्षांपूर्वी या पार्कमध्ये वाघांची संख्याही फार वाढली होती. २००६ मध्ये या पार्कला टायगर रिझर्व्ह दर्जा देण्यात आला होती. या नॅशनल पार्कमध्ये हॉर्नबिल, आयबिस, ब्लॅक नेक स्टॉर्क, रिंगटेल फिशिंग इगल आणि हुलॉक गिब्बनसारखे आणखीही काही वेगळे पक्षी बघायला मिळतात. 

गेंड्यांचे प्रकार

जगभरात पाच प्रकारचे गेंडे आढळतात, पांढरे, काळे, इंडियन, जावन आणि सुमात्रन. पांढऱ्या आणि काळ्या गेंड्यांची प्रजाती आफ्रिकेत आढळते. इंडियन, जावन आणि सुमात्रन या आशियाई प्रजाती उत्तर पाकिस्तान, नेपाळ, भूतान आणि बांग्लादेशात आढळतात. गेंड्यांच सरासरी वजन २ हजार किलोग्रॅम असतं. आफ्रिकेतील गेंड्यांना वेगळं ठरवतं ते त्यांचं एक शिंग. त्यांना केवळ एकच शिंग असतं. त्यासोबतच त्यांच्या त्वचेवर वेगवेगळ्या घड्याही असतात. 

कधी जाल?

दरवर्षी १ मे ते ३० ऑक्टोबरपर्यंत काजीरंगा नॅशनल पार्क पर्यटकांसाठी बंद ठेवलं जातं. त्यामुळे नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान तुम्ही इथे येण्याचं प्लॅनिंग करु शकता. 

कसे पोहोचाल?

विमान मार्गे - जोरहाट येथील सर्वात जवळचं एअरपोर्ट आहे. हे काजीरंगापासून ९७ किमी अंतरावर आहे. त्यासोबतच गुवाहाटी एअरपोर्टचाही पर्याय आहे. हे काजीरंगापासून २१७ किमी अंतरावर आहे. इथून कॅबने काजीरंगाला पोहोचता येतं. 

रेल्वे मार्ग - रेल्वे मार्गाने इथे पोहोचणे सर्वात सोपे आहे. कारण इथपर्यत पोहोचण्यासाठी रेल्वेचे अनेक पर्याय आहेत. गुवाहाटी येथील सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे. 

रस्ते मार्गे - रोडने इथे पोहोचण्यासाठी आधी गुवाहाटी किंवा जोरहाटला पोहोचावं लागेल. तेथून बस किंवा टॅक्सी उपलब्ध होतील.
 
Web Title: One horn rhinos in Kajiranga national park-
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

ताजा खबरें

'बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल', उदयनराजेंचं परिपत्रक जारी

'बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन मतदारांची दिशाभूल', उदयनराजेंचं परिपत्रक जारी

6 minutes ago

प्रसिद्ध सलून मालकांना कोट्यावधीचा चुना; ५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

प्रसिद्ध सलून मालकांना कोट्यावधीचा चुना; ५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

8 minutes ago

सोशल मीडिया’ आला कामी..  स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब  

सोशल मीडिया’ आला कामी..  स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब  

13 minutes ago

जेट एअरवेजची 'मुंबई-औरंगाबाद-मुंबई' बुकिंग ठप्प

जेट एअरवेजची 'मुंबई-औरंगाबाद-मुंबई' बुकिंग ठप्प

15 minutes ago

नाधवडे विद्यालयात चोरट्यांचा डल्ला -छपराची कौले काढून केला प्रवेश

नाधवडे विद्यालयात चोरट्यांचा डल्ला -छपराची कौले काढून केला प्रवेश

15 minutes ago

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट

16 minutes ago

ट्रॅव्हल अधिक बातम्या

बेस्ट रोमॅन्टिक डेस्टिनेशन आहे 'पूवार'; अ‍ॅडव्हेंचर्स अनुभवण्यासाठी नक्की जा

बेस्ट रोमॅन्टिक डेस्टिनेशन आहे 'पूवार'; अ‍ॅडव्हेंचर्स अनुभवण्यासाठी नक्की जा

16 hours ago

आश्चर्यच, दिवसातून तीन वेळा रंग बदलते हे शिवलिंग; एकदा तरी दर्शन नक्की घ्या

आश्चर्यच, दिवसातून तीन वेळा रंग बदलते हे शिवलिंग; एकदा तरी दर्शन नक्की घ्या

1 day ago

सर्वात मोठं अंडर वॉटर थीम पार्क 'या' ठिकाणी होणार, मोत्यांचं घर खास आकर्षण ठरणार

सर्वात मोठं अंडर वॉटर थीम पार्क 'या' ठिकाणी होणार, मोत्यांचं घर खास आकर्षण ठरणार

2 days ago

तिबेटची सफर करा अन् अनुभवा अतुलनीय संस्कृतीचा ठेवा!

तिबेटची सफर करा अन् अनुभवा अतुलनीय संस्कृतीचा ठेवा!

3 days ago

केदारनाथ मंदिराजवळ आहेत 5 सुंदर ठिकाणं; 'ही' नाही पाहिलीत तर ट्रिप अपूर्णच

केदारनाथ मंदिराजवळ आहेत 5 सुंदर ठिकाणं; 'ही' नाही पाहिलीत तर ट्रिप अपूर्णच

5 days ago

पावसात फिरायला जाताना 'या' ७ गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!

पावसात फिरायला जाताना 'या' ७ गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!

5 days ago