जिवंतपणी मृत्यू पाहायचाय?... हिंमत असेल तर 'या' ५ ठिकाणांना भेट द्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 12:09 PM2018-03-29T12:09:45+5:302018-03-29T12:09:45+5:30

अशी काही पर्यटनस्थळं जिथे गेल्यावर तुम्हाला मृत्यूला जवळून पाहिल्याचा भास नक्कीच होईल.

Most Dangerous Tourist Destinations in the World | जिवंतपणी मृत्यू पाहायचाय?... हिंमत असेल तर 'या' ५ ठिकाणांना भेट द्या!

जिवंतपणी मृत्यू पाहायचाय?... हिंमत असेल तर 'या' ५ ठिकाणांना भेट द्या!

Next
ठळक मुद्देमनमोकळेपणानं भटकंती करण्यासोबतच निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता आला तर पर्यटनाची मजा आणखी वाढेल.गूढ आणि रहस्यमय ठिकाणी जाण्यात तुम्हाला कितपत स्वारस्य आहे?कारण जगाच्या पाठीवर तशीच काही ठिकाणं अस्तित्वात आहेत.

मुंबई : कामाच्या दगदगीतून थोडासा विरंगुळा मिळावा, यासाठी ब-याचदा पर्यटनाचे बेत आखले जातात. मनमोकळेपणानं भटकंती करण्यासोबतच निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता यावा, त्यासाठी अशी ठिकाणं हुडकली जातात. परंतु त्यातील काहींना गूढ आणि रहस्यमय ठिकाणी जाण्यात जास्त स्वारस्य असतं. तशीच काही ठिकाणं या जगातही अस्तित्वात आहेत. जिथे गेल्यावर तुम्हाला मृत्यूला जवळून पाहिल्याचा भास नक्कीच होईल. जाणून घेऊयात या मृत्यूच्या दाढेतील काही पर्यटनस्थळांबाबत....

1) डेथ व्हॅली ( अमेरिका) 

डेथ म्हणजे अर्थातच मरण, डेथ व्हॅली या नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की हे किती भयावह ठिकाण आहे. या ठिकाणाला मृत्यूचं वाळवंट म्हटल्यासं वावगं ठरू नये. डेथ व्हॅली इथलं तापमान ५६.७ अंश सेल्सिअसच्या आसपास असतं. इथल्या तापमानात व्यक्ती पाण्याशिवाय फार फार तर १४ तास जगू शकतो.

२) द डनाकिल डेझर्ट (एरिट्रिया)

‘पृथ्वीवरचं नरक’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या द डनाकिल डेझर्टचं तापमान ५० अंश सेल्सिअसच्या दरम्यान असतं. या वाळवंटातून विषारी वायू व रसायने बाहेर पडत असल्याचा अनेकांनी दावा केला आहे. तसेच या वाळवंटात खनिज उत्खननही केलं जातं. अनुभवी गाईडशिवाय पर्यटकांना इथे येण्यास परवानगी दिली जात नाही.

पाहा फोटोज - पुण्यातील या ५ ऐतिहासिक वास्तू तुम्हाला माहित आहेत का?

३) माऊंट वॉशिंग्टन ( अमेरिका) 

मिसिसिपी नदीच्या पूर्वेकडे वसलेलं माऊंड वॉशिंग्टन हे शिखर नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलंय. जमिनीच्या पृष्ठभागापासून हे पर्वत फार उंचावर आहे. या पर्वतावर प्रतितास २३१ मैलाच्या वेगानं वारे वाहत असून, याची वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे. उत्तरपूर्व अमेरिकेतील हे सर्वात उंच शिखर आहे. या शिखराची जमिनीपासून उंची ६२८८ फूट इतकी आहे.

आणखी वाचा - ही आहेत मुंबईजवळील ट्रेकर्सची आवडती ८ ठिकाणं, तुम्ही जाऊन आलात का ?

४) मादिदी नॅशनल पार्क ( बोलिव्हिया)

बोलिव्हिया देशातल्या अॅमेझॉन नदीच्या वरच्या बाजूला मादिदी नॅशनल पार्क आहे. या नॅशनल पार्कमध्ये अनेक प्रकारचे हिंस्र प्राणी पाहायला मिळतात. त्यामुळे या पार्कात पर्यटकांना सुरक्षितरीत्या फिरावं लागतं. मादिदी नॅशनल पार्कात अनेक प्रजातीचे विषारी जीवजंतू आढळतात. या जीवजंतूंच्या स्पर्शानं मृत्यूही ओढवण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे या जंगलात फिरताना खूपच सावधानता बाळगावी लागते.

५) नेट्रॉन लेक ( टांझानिया )

टांझानियातील नेट्रॉन लेक हा केनियापर्यंत पसरलेला आहे. या लेकामध्ये विषारी मिठाचं प्रमाण जास्त असल्यानं काही मोजकेच जलचर प्राणी येथे आढळतात. सर्व जलचरांसाठी हा जलाशय अनुकूल नाही. तसेच या जलाशयामध्ये पोहायला जाण्यास पर्यटकांना मज्जाव केला जातो. पाण्यात विषारी मिठाचं प्रमाण असल्यानं शरीराला इजा होण्याची शक्यता असते.

Web Title: Most Dangerous Tourist Destinations in the World

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.