ही आहेत मुंबईजवळील ट्रेकर्सची आवडती ८ ठिकाणं, तुम्ही जाऊन आलात का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 07:26 PM2018-03-05T19:26:02+5:302018-03-05T19:26:02+5:30

#Mumbai 8 BEST PLACES FOR TRECKING NEARBY MUMBAI | ही आहेत मुंबईजवळील ट्रेकर्सची आवडती ८ ठिकाणं, तुम्ही जाऊन आलात का ?

ही आहेत मुंबईजवळील ट्रेकर्सची आवडती ८ ठिकाणं, तुम्ही जाऊन आलात का ?

googlenewsNext
ठळक मुद्देमार्च महिन्याची सुरुवात झाली असून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये काय करायचं हा प्रश्न एव्हाना सर्वांना पडला असेलआम्ही तुम्हाला हे काही पर्याय सुचवत  आहोत जिथे या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही जाऊ शकता.ही सर्व ठिकाणं मुंबईपासून काही किमी अंतरावर असल्याने जास्त लांबचा प्रवास करण्याची गरजही पडणार नाही.

मुंबई : मार्च महिन्याची सुरुवात झाली असून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये काय करायचं हा प्रश्न एव्हाना सर्वांना पडला असेल. आम्ही तुम्हाला हे काही पर्याय सुचवत  आहोत जिथे या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही जाऊ शकता.  ही सर्व ठिकाणं मुंबईपासून काही किमी अंतरावर असल्याने जास्त लांबचा प्रवास करण्याची गरजही पडणार नाही.

1. देवकुंड धबधबा

मुंबईपासून सुमारे 150 किमी अंतरावर असणाऱ्या कोलाड येथील भिरा गावाजवळ असलेलं देवकुंड धबधबा आहे. स्वच्छ पाणी व ट्रेकिंगसाठी सोपे असलेल्या या ठिकाणी तीन धबधब्यांचा संगम होतो व भलामोठा देवकुंड धबधबा तयार होतो.

2. विजापूरचा किल्ला

मुंबईपासून 100 किमी दूर लोणाववळ्याजवळ व माळवली स्टेशनपासून 5 किमीवर विसापूरचा किल्ला आहे. या किल्ल्याच्या आतमध्ये सुंदर लेणी पाहायला मिळतील. विशेषतः येथे वेगळ्या प्रकारची जुनी घरंदेखील अद्यापपर्यंत आहेत. किल्ल्याच्या टोकावर जाण्यासाठी जवळपास 1 तास लागतो पण रस्त्यात तुम्हाला पवना धबधब्याची मजाही लुटता येते. 

3. ड्युक्स नोज 

विकेन्ड अगदी मुंबईपासून जवळ तसंच शांत ठिकाणी घालवायचा असेल तर मुंबईपासून जेमतेम तीन तासांचच्या अंतरावर आहे. मुंबई ,पुणे व जवळील परिसरातील तरुण पर्यटक येथे ट्रेकिंगचा आनंद लुटतात. विशेष म्हणजे, ड्युक्स नोज हे येथे एक जवळच शिखर आहे तेथून पर्यटकांना खंडाळा आणि भोर घाटाच्या नैसर्गिक सौंदर्याचा देखावा नजरेत सामावता येतो.

4. राजमाची

लोणावळ्यातील प्रसिद्ध किल्ला म्हणजे राजमाची. सह्याद्रीच्या पर्वतरांगा व शिरोता धबधब्याचं किल्ल्यावरून दिसणारं दृश्य ट्रेकर्सना आकर्षित करतं. पावसाळ्यात व हिवाळ्यात राजमाचीला भेट नक्की द्या.

5. अलंग आणि मदन

मुंबईतील सर्वात कठीण ट्रेकिंग स्पॉट म्हणून हे ठिकाण ओळखले जाते. या ठिकाणी कुलांग, कुलनवाडी, मदन असे तीन किल्ले असून कुलांग हा चढण्यासाठी सर्वात कठीण आहे. त्यामुळे इथे ट्रेकिंगला जाणार असाल तर तुमच्या संयम, धाडस आणि शक्तीची परीक्षाच असते. 

6. ताम्हिणी घाट 

मुळशी धबधब्याच्या जवळच असलेलं हे ठिकाण अगदी उंचावर आहे. रस्त्यावरून पाहिलं तर हा घाट अगदी प्रशस्त दिसतो. हा घाट इथे असणारी हिरवळ, व्हॅली आणि धबधब्यांमुळे प्रसिद्ध आहे. त्यामुळेच ट्रेकिंगला येणाऱ्या प्रत्येकाला ताम्हिणी घाटाचं आकर्षण असतं.

7. कळवणी दुर्ग

प्रभळ गडाच्या शेजारीच असलेल्या हा किल्ला ट्रेकर्सच्या सर्वाधिक पसंतीचा किल्ला आहे. या गडावर पोहोचण्यासाठी पायऱ्या नसून आपल्याला स्वत:ला मार्ग तयार करावा लागतो. धाडसी ट्रेकर्संना इथे ग्रुप ट्रेकिंगचीच गरज असते.

8. हरिहर किल्ला  

नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे २० कि.मी. अंतरावर वसलेला हरिहरगड ऊर्फ हर्षगड आहे. हा किल्ला  प्राचीन काळात बांधला गेलेला आहे. हा किल्ला इतिहासकाळात शेजारच्या त्र्यंबकगडा पाठोपाठ या भागातील महत्त्वाचा दुसरा किल्ला आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये हरिहर किल्ला आपले वेगळेपण जपतो.

Web Title: #Mumbai 8 BEST PLACES FOR TRECKING NEARBY MUMBAI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.