मोफत जेवणं, तिकीट कॅन्सल केल्यास चार्ज नाही; विमान प्रवासाचे नवे नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 01:31 PM2019-03-06T13:31:50+5:302019-03-06T13:35:07+5:30

जर तुम्ही नेहमीच कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी हवाई मार्गाने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मिनिस्ट्री ऑफ सिविल एविएशन  (Ministry of Civil Aviation) तर्फे काही नियमांमध्य बदल करण्यात आले आहेत.

Major changes done by civil aviation ministry for the benefit of Indian passengers | मोफत जेवणं, तिकीट कॅन्सल केल्यास चार्ज नाही; विमान प्रवासाचे नवे नियम

मोफत जेवणं, तिकीट कॅन्सल केल्यास चार्ज नाही; विमान प्रवासाचे नवे नियम

Next

जर तुम्ही नेहमीच कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी हवाई मार्गाने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मिनिस्ट्री ऑफ सिविल एविएशन  (Ministry of Civil Aviation) तर्फे काही नियमांमध्य बदल करण्यात आले आहेत. ज्यानंतर प्रवाशांसाठी हवाई प्रवास करणं आणखी सोपं होणार आहे. हे सर्व नियम प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि त्यांचा प्रवास आणखी सुखकर व्हावा म्हणून तयार करण्यात आले आहेत. जाणून घेऊया मंत्रालयाने प्रवाशांच्या सोयीसाठी काय बदल केले आहेत... 

1. मोफत जेवण

जर तुमची फ्लाइट 2 ते 6 तास उशीराने असेल तर तुम्हाला प्रवासादरम्यान फ्लाइटमध्ये जेवण देण्यात येणार असून तुम्हाला यासाठी अजिबात पैसे मोजावे लागणार नाहीत. 

2. मोफत तिकीट

जर फ्लाइट 6 तासांपेक्षा जास्त उशीराने होत असेल तर तुम्ही हक्काने दुसऱ्या फ्लाइटचं तिकीट मागू शकता. एवढचं नाही तर तुम्हाला कोणताही एक्स्ट्रा चार्च द्यावा लागणार नाही. दुसऱ्या फ्लाइटऐवजी तुम्ही त्याचवेळी तत्काळ रिफंडही मागू शकता. 

3. कॅन्सल फ्लाइटचं संपूर्ण कन्सेशन 

जर फ्लाइट कॅन्सल झाल्याची सूचना तुम्हाला फ्लाइटच्या 24 तास आधी नाही मिळाली तर तुम्हाला संपूर्ण कन्सेशन देण्यात येइल. एवढचं नाही तर मागील फ्लाइटला उशीर झाल्यामुळे तुमची पुढची फ्लाइट मिस झाली तर त्या फ्लाइटसाठी तुम्हाला पूर्ण कंन्सेशन मिळेल. 

4. एयरलाइन स्वतः देणार दुसरी फ्लाइट 

जर प्रवासाच्या 24 तासांच्या आतमध्ये तुमची फ्लाइट कॅन्सल होत असेल तर एयरलाइन कंपनीकडून तुम्हाला दुसरी फ्लाइट मोफत देण्यात येईल. 

5. तिकीट कॅन्सल केल्यानंतर कोणताही चार्ज आकारण्यात येणार नाही

जर तिकीट बुक केल्यानंतर 24 तासांच्या आत तुम्ही तिकीट कॅन्सल करत असाल तर तुम्हाला संपूर्ण पैसे परत मिळतील. जर एक आठवड्याच्या आत कॅन्सल करत असाल तर फ्लूल आमि बेस फेयर चार्च अप्लाय करून उर्वरित रक्कम परत करण्यात येईल. 

6. कोणताही चार्ज आकारल्याशिवाय नाव बदला

जर तुम्ही तिकीट बुक करताना चुकीचं नाव टाकलतं तर 24 तासांच्या आतमध्ये कोणताही चार्ज न भरता तुम्ही ते बदलू शकता. पहिल्यांदा हा बदल तिकीट कॅन्सल केलं असं समजून चार्ज आकारण्यात येत होता.

7. तिकीटाचं पैसे परत मिळणार

जर फ्लाइटची तिकीट पूर्ण झाल्यानंतरही तुमचं तिकीट बुक झालं तर एयरलाइन कंपनीकडून  तुम्हाला दुसरी फ्लाइट देण्यात येइल. 

8. बॅग तुटली तर पैसे परत मिळणार

जर एयरलाइन कंपनीकडून प्रवासादरम्यान तुमची बॅग तुटली किंवा एखादं सामान हरवलं तर तुम्हाला 350 रूपये प्रति किलो वजनाच्या हिशोबाने पैसे मिळणार. 

9. फ्लाइटच्या दरम्यान मृत्यू झाल्यास

जर फ्लाइटमधून प्रवास करताना एयरलाइन्स कंपनीच्या चुकीमुळे मृत्यू झाला किंवा कोणताही त्रास झाल्यास कंपनी 20 लाख पर्यंत नुकसान भरपाई देण्यात येईल. 

Web Title: Major changes done by civil aviation ministry for the benefit of Indian passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.